अंग्रेज गये नमो आये घोषणेने वंचित बहुजन आघाडी तर्फे प्रांतअधिकारी तहसीलदारांना निवेदन जीएसटी दर वाढ निर्णय रद्द करण्याची मागणी

अंग्रेज गये नमो आये  
घोषणेने वंचित बहुजन आघाडी तर्फे प्रांतअधिकारी तहसीलदारांना निवेदन जीएसटी दर वाढ  निर्णय रद्द करण्याची मागणी

येवला : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने नुकताच घेतलेला जीएसटी कर दरवाढ निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाळासाहेब शिंदे व वंचित महिला जिल्हा अध्यक्ष उर्मिला ताई गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले

सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त असताना।केंद्र सरकारने पुन्हा एकदा जीएसटी कर दरवाढ निर्णय घेतल्याने त्या निर्णयाची अंमलबजावणी 18 जुलै पासून होत असल्याने सर्वसामान्य जनता, शेतकरी ,शेतमजूर यांना अधिक आर्थिक  बोजा बसणार असल्याने ती जीएसटी कर दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी प्रांत कार्यालय ,तहसील कार्यालय येथे अंग्रेज गये नमो आहे घोषणा देत झिंजिया कर रद्द करा अशी मागणी चे निवेदन वंचित बहुजन आघाडी वतीने देण्यात आले 
    वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना  दैनंदिन गरजेच्या वस्तूसाठी जास्त पैसे मोजावे लागणार असून आज पर्यंत करमुक्त असलेल्या स्थानिक दूध डेरी ,कृषी उत्पादने त्याचबरोबर अंत्यविधीच्या वस्तूवर देखील जीएसटी लादण्याचा निर्णय हा अन्यकारक असल्याने ही 
अवाजवी दरवाढ निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 8 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय येथे आंदोलन छेडणयाचा इशाराही यावेळेस निवेदनाद्वारे देण्यात आला आहेत यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते बाळासाहेब शिंदे, दीपचंद दोदे ज्येष्ठ नेते ,पंडित नेटावटे  महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उर्मिला ताई गायकवाड ,सोनल ताई गायकवाड येवला तालुकाध्यक्ष संजय पगारे, जिल्हा नेते चंद्रकांत साबळे, मुख्तार मुख्तार तांबोळी  शशिकांत जगताप , सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड  गफार शेख ,दयानंद जाधव  साहेबराव भालेराव  भाऊसाहेब अहिरे  बाळासाहेब शिंदे  पोपट खंडागळे, प्रवीण संसारे  दिवाकर वाघ ,अशोक पगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
थोडे नवीन जरा जुने