विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगला विद्यार्थी मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा
येवला : पुढारी वृत्तसेवा
विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोकशाहीची मूल्ये मुलांमध्ये रुजवण्यासाठी शाळेतर्फे निवडणुक होऊन प्रमुख विद्यार्थी मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आयोजित केला होता.यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदरपणे संचलन देखील सादर केले.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रिटायर्ड आर्मी मेजर दिपक आहेर हे उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीले केलेले संचलन,जुन्या हेड बॉय व हेड गर्लने आपली जबाबदारी ध्वज देऊन नवीन निवडून आलेल्या उमेदवारकडे ज्याप्रमाणे सुपूर्द केली ते पाहून श्री.आहेर भारावून गेले आणि आपल्याला आपले सैन्यात असतानाचे दिवस आठवल्याचे नमूद केले.
शाळेमध्ये निवडणुकांचे हे चौदावे वर्ष आहे.यावेळी श्री आहेर म्हणाले की,विद्यार्थ्यांनी अभ्यासाला जर स्वयं शिस्तीची जोड जर दिली तर यश तुमच्यापासून दूर जाणार नाही.ज्याप्रमाणे सैनिकांना शारीरिक फिटनेस व मानसिक अवस्था संतुलित ठेवावी लागते तशीच विद्यार्थ्यांनी देखील आपली शारीरिक व मानसिक अवस्था चांगली ठेवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे असे सांगत श्री. आहेर यांनी मुलांना सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रोत्साहित केले व त्याकडे फक्त चांगली नोकरीं म्हणून न बघता देशसेवा व त्यागाच्या भावनेतून बघावे असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात मशाल पेटवून करण्यात आली.मशाल मिरवण्याचा मान हा शाळेतील राष्ट्रीय टेनिस खेळाडू लक्ष गुजराथी या विद्यार्थ्याला मिळाला.मागील वर्षाचे हेड बॉय व हेड गर्ल त्याचप्रमाणे सर्व हाऊसच्या उमेदवारांनी आपली जबाबदारी नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थ्यांकडे ध्वज देऊन सुपूर्द केली. प्रमुख पाहुण्यांनी सर्वाना बॅच देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर सर्वाना आपल्या जबाबदारीची व कर्तव्याची शपथ देण्यात आली.
यावर्षी निवडणुकांमध्ये शाळेचा हेड बॉय म्हणून इयत्ता नववीचा विद्यार्थी ध्रुव पाटील तर हेड गर्ल म्हणून आर्या फड हे निवडून आले.त्याचबरोबर रुबी,इम्राल्ड, सफायर आणि टोपाझ हाऊस यासाठी सुद्धा निवडणूक प्रक्रिया पार पडली. या हाऊस साठी शार्दूल नावंदर,रिद्धी राका, कुणाल गायकवाड,सिया गुप्ता,शर्जील शेख,मनस्वी मार्शा,उत्कर्ष गोगड व तेजस्वी खैरनार हे निवडून आले.
या सर्व उपक्रमातून विद्यार्थ्यामध्ये लोकशाही,स्वयं शिस्त,जबाबदारी व कर्तव्याची मूल्ये रुजली जातील असे प्रतिपादन मुख्याध्यापिका शुभांगी शिंदे यांनी केले.संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेश पटेल,संचालिका डॉ.संगीता पटेल यांनी सर्व निवडून आलेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.शुभांगी राजनकर,किरण कुलकर्णी,मोईज दिलावर यांनी नियोजन केले.
धानोरे : विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेला विद्यार्थी मंत्रिमंडळ शपथविधी.
धानोरे : विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळ शपथविधीप्रसंगी संचलन करतांना विद्यार्थी