येवल्यातील दोन सराईत गुन्हेगार एक वर्षाकरीता जिल्ह्यातून हद्दपार
येवला : पुढारी वृत्तसेवा
शहरात मागील काही दिवसात घडलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभुमीवर रेकाँर्डवरील सराईत दोन गुन्हेगारांना एक वर्षाकरीता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
मालेगाव,मनमाड,श्रीरामपूर ही शहरे जवळ असल्याने तालुक्यात छोठे-मोठे गुन्हे नेहमीच घडत असतात.याबात पोलीस अधीक्षक सचिन पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे यांनी दिलेल्या सुचने वरुन शहर पोलीस ठान्याने ही कारवाई केली आहे.शहरातील सराईत गुन्हेगार भु-या उर्फ सचिन गिरिधर राजपुत (रा. बुंदेलपुरा) व पवन उर्फ गोरख प्रकाश निकम (रा.येवला) यांच्यावर ही कारवाई झाली आहे.गेल्या अनेक दिवसापांसुन शहरात चोरी,जबरी चोरी या सारखे अनेक गुन्हे करण्यात पटाईत असलेल्या गुन्हेगारांवर शहरामध्ये गुन्हेगारीला आळा बसण्याचे उद्देशाने शहर पोलीस ठान्याने त्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पाठवीले होते. त्याला येवला प्रांत कार्यालयाने मान्यता दिली आहे.त्यानुसार पोलीस निरिक्षक भगवान मथुरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अप्पासाहेब खडांगळे,उपनिरीक्षक सूरज मेढे व अमलदार यांच्या मदतीने सदर गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्याचे भौगोलीक हद्द सिमेतुन पुढील एक वर्षाकरीता हद्दपार केले आहे.