इम्पेरिकल डेटाचे सदोष पद्धतीचे काम तात्काळ थांबवावे
येवल्यात महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनेतहसीलदारांना दिले निवेदन
येवला : पुढारी वृत्तसेवा
समर्पित आयोगामार्फत ओबीसी इम्पेरिकल डेटा सदोष पद्धतीने होत असून चुकीचे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने निर्देशीत केले नुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी बाठीया यांचे अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे. सदर आयोगाने माननीय सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पेरिकल डाटा दारोदार जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होती परंतु, आयोग वरीलप्रमाणे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत आहे. ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक आहे सॉफ्टवेअरवर सामाजिक, राजकीय आर्थिक परिस्थितीची माहिती जमा करणे म्हणजे ओबीसी समाजाचे भविष्यातील याचे कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. याकरिता समर्पित आयोगा द्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे व तलाठी, ग्रामसेवक अंगणवाडी सेविका, आशावकर यांचे मार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासना मार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावे अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी डॉ. मोहन शेलार, माजी जि.प.अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, सुनील पैठणकर, सचिन कळमकर, दीपक लोणारी, संतोष खैरनार, अजीज शेख, बबनराव शिंदे, सचिन सोनवणे, डॉ.प्रदीप बुळे, भगवान ठोंबरे, सुमित थोरात, गोटू मांजरे, सुभाष गांगुर्डे, विकी बिवाल आदी उपस्थित होते.