प्रतिकुलतेवर मात करत वैष्णवीने केली वडिलांची स्वप्नपूर्ती!



प्रतिकुलतेवर मात करत वैष्णवीने केली वडिलांची स्वप्नपूर्ती!
सावरगाव विद्यालयात प्रथम,सेमी माध्यमाचा निकाल १०० टक्के

येवला : पुढारी वृत्तसेवा
वडील बारावी सायन्स उत्तीर्ण पण परिस्थिती अभावी शिक्षण थांबले..त्यात घरची परिस्थिती बेताची.. पण आपले शिक्षण झाले नाही म्हणून काय झाले,मुलांनी तरी शिकावे हे स्वप्न घेऊन मुलांच्या शिक्षणाची तळमळ ठेवणाऱ्या सावरगाव येथील शेतकरी देवीदास काकड यांची स्वप्नपूर्ती त्यांच्या लेकीने केली आहे.वेळोवेळी शेती कामात अन घरकामात मदत करून अभ्यास करत तीने ९०.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा सेमी माध्यमाचा निकाल १०० टक्के तर एकत्रित निकाल ९७.१९ टक्के लागला. अतिशय प्रतिकूलतेवर मात करत कुटुंबाचे अपेक्षांचे ओझे पेलवत शेतीसाठी मदतीचा हात देतानाच घरची जवाबदारीही निभावत वैष्णवी काकड हिने सेमी माध्यमात ९०.६० टक्के मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.द्वितीय क्रमांक मराठी माध्यमाची कीर्ती गायकवाड हीने मिळवला असून तिनेही जिद्दीच्या बळावर ९०.२० टक्के गुण मिळवले.कीर्ती शेतकरी कुटुंबातील असून अनकुटे येथून सायकलवर पाच किलोमीटरचा प्रवास करून रोज ती शाळेत यायची.शाळेतून घरी गेली की पुन्हा आई-वडिलांना मदतीचा हात देऊन अभ्यास करत तिने हे यश संपादन केले आहे.तृतीय क्रमांक श्रुती निकम हिने ८९.८० टक्के मिळवत संपादन केला आहे.तीचे वडील शंकर निकम हे प्राथमिक शिक्षक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने मिळवलेले यश देखील कौतुकास्पद आहे.
विद्यालयाचे ५६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ४० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोददादा पाटील,सहसचिव प्रविणदादा पाटील,युवा नेते संभाजीराजे पवार,माजी सरपंच प्रसाद पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना प्राचार्य शरद ढोमसे,पर्यवेक्षक व्ही.एन.दराडे,योगेश भालेराव,उमाकांत आहेर,गजानन नागरे,वसंत विंचू,
पोपटराव भाटे,कैलाश मोरे,उज्वला तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा विद्यालयाच्या प्रांगणात आज सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य श्री.ढोमसे,श्री.दराडे,जेष्ठ शिक्षक साहेबराव घुगे,यशवंत दराडे,नामदेव पवार,लक्ष्मण माळी,संतोष विंचू,राजकुवर परदेशी, योगेश पवार,रविंद्र दाभाडे,संजय बहीरम,भाग्यश्री सोनवणे,सगुना काळे,
सविता पवार,अर्चना भुजबळ,श्रीमती शिंदे,प्रमोद दाणे,विकास व्यापारे,ऋषिकेश काटे,मयुरेश पैठणकर,रोहित गरुड,सुनील चौधरी,मच्छिंद्र बोडके,लक्ष्मण सांगळे,सागर मुंढे आदीनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

सावरगाव : न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय प्रथम तीन क्रमांकांमे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी प्राचार्य शरद ढोमसे व शिक्षक
थोडे नवीन जरा जुने