येवल्याच्या वैष्णवीचा सॉफ्टबॉलमध्ये ५० वर स्पर्धात सहभाग राष्ट्रीय स्पर्धात चमकदार कामगिरी,चंदीगडला महाराष्ट्राला मिळाले ब्रॉन्ज पदक

येवल्याच्या वैष्णवीचा सॉफ्टबॉलमध्ये
५० वर स्पर्धात सहभाग 
राष्ट्रीय स्पर्धात चमकदार कामगिरी,चंदीगडला महाराष्ट्राला मिळाले ब्रॉन्ज पदक

येवला : पुढारी वृत्तसेवा


येथील वैष्णवी निकम या विद्यार्थिनीने शालेय दसेपासूनच सॉफ्टबॉलमध्ये आपल्या खेळाची चुणूक दाखवत तिने थेट राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा गाजविल्या असून नुकत्याच चंदीगड येथील राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार खेळ करून महाराष्ट्राच्या टिमला ब्रॉन्ज मेडल मिळवून देण्यात तिने महत्वाची भूमिका निभावली आहे.जिल्हा,राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ५० वर स्पर्धात तिने आत्तापर्यंत चमकदार खेळ केला आहे.
येथील वास्तुविशारद प्रशांत निकम यांची 
वैष्णवी मुलगी आहे.आई-वडिलांकडून प्रेरणा घेत तीची यशस्वी वाटचाल सुरू आहे.कोपरगाव येथे संजीवनी अकॅडमी येथे ती दहावीपर्यत शिक्षण घेत असल्याने अहमदनगर जिल्ह्याकडून खेळते.आता ती अकरावीच्या वर्गात येथे शिकत आहे.
या खेळात सात वर्षांपासून खेळतांना तीने नागपूर,भुसावळ,मुंबई,नाशिक,
अमरावती,वाशीम अशा अनेक ठिकाणी राज्यस्तरीय १० वर स्पर्धात वेगवेगळ्या राष्ट्रीय २५ वर स्पर्धात तिने सहभाग नोंदवला असून विजेतेपद मिळवले आहे.
जळगाव येथील सिनियर विंटरलीग स्पर्धेत तिला नवी मुंबईच्या संघाकडून खेळण्याचा मान मिळाला आहे.तर राष्ट्रीय पातळीवर चार स्पर्धात तिने मेडल मिळवले आहे.
नुजतीच पंजाब युनिव्हर्सिटी,चंदिगढ येथे ४० वी ज्युनिअर नॅशनल चॅम्पीयन शिप स्पर्धा झाल्या.त्यासाठी महाराष्ट्राच्या संघासाठी सिलेक्शन ट्रायल्स नागपुर येथे झाल्या.त्यात वैष्णवीच्या उत्कृष्ठ खेळामुळे तीचे महाराष्ट्र संघात निवड होऊन नागपूर येथेच तीन दिवसांची ट्रेनिंग कॅम्प झाल्यावर सर्व महाराष्ट्राची टिम चंदिगड येथे नॅशनल स्पर्धेसाठी गेली होती.येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या 
संघाने चमकदार कामगिरी करत ब्रॉन्ज मेडल मिळविले आहे.या स्पर्धेत वैष्णवीने देखील उत्कृष्ट खेळ सादर केला.
वैष्णवीने या अगोदर सॉफ्टबॉल व बेसबॉक स्पर्धेसाठी फतेहपुरसाहीब, पंजाब-पोनी नॅशनल स्पर्धेत सिल्वर पदक मिळवले.इंदौर (मध्यप्रदेश) येथील पोनी नॅशनल स्पर्धेत चौथे स्थान मिळवले तर जळगाव येथील स्पर्धेतही सहभाग नोंदवला.कटक (ओडीसा) येथे झालेल्या सबज्युनिअर नॅशनल स्पर्धेत सहभाग घेतला. विशाखापट्टणम् येथील ज्युनिअर नॅशनल चॅम्पीअनशिपमध्ये सिल्व्हर पदकाला गवसणी घातली.इंदापुर येथील बेसबॉल स्कुल नॅशनल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले आहे.या वाटचालीत तीला संजिवनी अकॅडमी,वीरूपक्ष रेड्डी,शिरीष - नांदुर्डीकर,बादल लोणारी व नवचैतन्य क्रिडा मंडळाचे विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.

"शालेय दशेपासून खेळाची आवड निर्माण होत गेली.खेळताना आपण उत्कृष्ट खेळ करायचा आणि विजय मिळवायचा हाच हेतू नेहमी ठेवला आणि यश मिळत गेले.यापुढेही राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा माणस असून त्यासाठी जोमाने सराव व तयारी करत आहे."
-वैष्णवी निकम,राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू,येवला

चंदिगढ : येथे मिळवलेल्या बक्षीसासह वैष्णवी निकम
थोडे नवीन जरा जुने