पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन
अंदरसुल : शब्बीर इनामदार
येथील ग्रामपंचायत सभागृहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले प्रारंभी सरपंच,सदस्य व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले यावेळी सरपंच सविता जगताप,उपसरपंच झुंजार देशमुख,ग्रामपंचायत सदस्य योगेश जहागीरदार, अमोल सोनवणे, भानुदास ढेपले, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बोराडे, आदींनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ रोकडे, किशोर बागुल, रविंद्र वाकचौरे, वैशाली शिंदे, अश्विनी खैरनार, ज्येष्ठ नेते भागीनाथ थोरात, गोरख नेवासकर,महेश देशमुख,दिपक सैंद्रे,योगेश सुराडे,मंगेश शिंदे,भाऊसाहेब कचरे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते
अंदरसुल;पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्तअभिवादन प्रसंगी सरपंच सविता जगताप समवेत मान्यवर