महाआरोग्य शिबिरात ३० वर आजारांची तपासणीसह औषधोपचार व शस्रक्रिया मोफत

महाआरोग्य शिबिरात ३० वर आजारांची तपासणीसह औषधोपचार व शस्रक्रिया मोफत
● आमदार दराडे बंधूकडून १ जूनला आयोजन
● मुंबई,पुणे,नाशिकसह विविध ठिकाणच्या तज्ञ डॉक्टरांसह ५०० जणांचा सहभाग

येवला - पुढारी वृत्तसेवा
 गरीब,गरजू व सर्वसामान्यांना सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणीसह उपचाराचा लाभ मिळावा, त्यांच्या शस्त्रक्रियाही करणे सुलभ व्हावे यासाठी आमदार नरेंद्र दराडे व शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त येथे १ जून रोजी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात २५ वर मोठ्या आजारांची तपासणी औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असून तालुक्यासह जिल्ह्यातील गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कुणाल दराडे फाऊंडेशनने केले आहे.
सर्वच प्रकारच्या नागरिकांना आज-काल अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते.त्यातच उपचार महागल्याने अनेक जण आजारांकडे दुर्लक्षही करतात.पुढे हाच आधार घातक ठरतो या सर्व पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेला मुंबई,
पुणे,नागपूर,नाशिकमधील डॉक्टरांकडून तपासणीसह उपचार मिळावा या हेतूने आमदार किशोर दराडे यांच्या संकल्पनेतून हे शिबिर होणार आहे. तपासणी,चाचणी,औषधउपचार तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व शस्त्रक्रिया असे महाआरोग्य शिबिराचे स्वरूप असून सर्व सुविधा मोफत मिळणार आहे.
धानोरे येथील मातोश्री आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे १ जून रोजी शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या निमित्ताने रक्तदान शिबीर,कर्करोग, तपासणी,लठ्ठपणा तपासणी,अवयवदान तसेच रक्ताच्या तपासण्या,एक्स-रे, सोनोग्राफी,एमजी,टूडी इको,मॅमोग्राफी या तपासण्या मोफत होणार आहेत.
या शिबिरात एम्स,केम,मविप्र,
एसएनबीटी,प्रवरा,जिल्हा रुग्णालय या हॉस्पिटलचे तज्ञ सहभागी होऊन तपासणी,उपचार करणार आहेत. नेत्ररोग,अस्थिव्यंग उपचार,मेंदू रोग,मूत्ररोग,कान,नाक,घसा,
कर्करोग जनरल आजार ग्रंथीचे विकार,त्वचा व गुप्तरोग,हृदयरोग,जनरल सर्जरी, प्लास्टिक सर्जरी,बालरोग,स्त्रीरोग,दंतरोग, श्वसनण विकार,क्षयरोग,लठ्ठपणा, जेनेटिक विकार, मानसिक आरोग्य या मोठ्या आजारांची तज्ञ मार्फत तपासणी होऊन उपचार केले जाणार आहे.गरजू रुग्णांवर छोट्या शस्रक्रिया येथेच होणार असून मोठ्या शस्रक्रिया मुंबई, नाशिक,पुणे आदी ठिकाणी होणार आहे.
गावोगावी शिबिरासदर्भात जनजागृती सुरू असून ५० हजारावर रुग्णांनी लाभ घेतील असे अपेक्षित आहे.गरीब व गरजूंना ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.सामाजिक बांधिलकी बाळगत जनतेच्या हितासाठी या भव्यदिव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार किशोर दराडे यांनी दिली.
■ अल्पदरात वर्षभरात शस्त्रक्रिया!
मातोश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून बाभूळगाव येथे गेल्या दोन वर्षापासून अल्पदरात गोरगरिबांची आरोग्य सेवा केली जात आहे.यामध्ये प्रसूती अवघ्या पाच हजार रुपयात केली जात असून कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया फक्त सहा हजार रुपयात व इतर शस्त्रक्रिया देखील अल्पदरात करून गोरगरिबांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे.हजारों रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला असून यामुळे तालुक्यातील जनतेला हक्काने आरोग्य सेवेचा लाभ मिळत असल्याची माहिती आमदार किशोर दराडे यांनी दिली.


थोडे नवीन जरा जुने