राजा रविवर्मा जयंती राष्ट्रीय कला दिन म्हणून साजरी
जिल्ह्यात कला शिक्षक महासंघाचा उपक्रम,चित्र प्रदर्शनाचे आयोजन
येवला : येवला न्यूज वृत्तसेवा
राज्य कला शिक्षक महासंघ व व्हिजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी राजा रविवर्मा जयंती राष्ट्रीय कला दिन म्हणून साजरी करण्यात आली.या प्रसंगी जेष्ठ कलाशिक्षकांचे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते.
यामुळे कला महासंघ जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सांगळे यांनी याबाबत मांडलेली कल्पना अस्तित्वात आली आहे.नाशिक येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांच्या अध्यक्षतेखाली विश्वास ठाकूर तसेच अधिक्षक उदय देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.यावेळी कोरोना कालातील दिवंगत कला शिक्षक कै.द.वा.मुळे,विनायक काकुळते,अनंत दराडे,
अंबादास नागपुरे,मधे,राजगिरे आदी शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी दिग्गज कलावंत भी.रा.सावंत,बाळ नगरकर,मुरलीधर रोकडे तसेच वासुदेव मराठे ,प्रसिद्ध व्यंगचित्रकार अवि जाधव,राठोड,संजय मराठे,कोठावळे अनेक कलावंत घडवणारे दीपक वर्मा, विद्याधर निरंतर,कला समीक्षक राजा पाटेकर,अशोक ढिवरे,कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मुरलीधर रोकडे, विलास टिळे,मुंजा नरवाडे यांसारख्या दिग्गज कलावंतांचा सन्मान करण्यात आला.शांताराम निफाडे व रामदास भिका अहिरे या सेवानिवृत्त होणाऱ्या कला शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी श्रीमती रेखा धात्रक यांनी राजा रविवर्मा यांच्या बद्दल माहिती सांगितली.विनोद सोनवणे या युवा चित्रकाराने राजा रविवर्मा यांचे पेंटिंग बनवून त्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.सचिन पगार,चंद्रशेखर सावंत, रमेश तुंगार,राजेंद्र लोखंडे,मिलिंद टिळे,
योगेश रोकडे,महेंद्र झोले,संदीप सूर्यवंशी,सालिक पटेल,
श्री.जाट,अशोक घुगे,मनोज मोगरे,दिलीप आहिरे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन जिल्हा सचिव राजेंद्र लोखंडे यांनी केले.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सांगळे यांनी केले.यावेळी किरण वाळुंज,पंकज भामरे,राजेंद्र निकम,केशव खताळे,संदीप सूर्यवंशी,कांदळकर,मिलिंद पाटील,कृष्णा जाधव,पुंडलिक बागुल,प्रकाश वखरे,अरविंद आहिरे,राजेंद्र दिघे,संध्या सासले यांच्यासह अनेक कला शिक्षक उपस्थित होते.
नाशिक : राजा रविवर्मा जयंतीनिमित्त राष्ट्रीय कला दिनी उपस्थित कला शिक्षक व सन्मानित शिक्षक