खतांची जादा दराने विक्री केल्यास कठोर कारवाई
मोहीम अधिकारी जमधडे : येवल्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांची आढावा बैठक
येवला : पुढारी वृत्तसेवा
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कुठल्याही खतांची सक्ती न करता जादा दरानेही खते विक्री करू नका.खतांची जादा दराने विक्री केल्यास दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मोहीम अधिकारी अभिजित जमधडे यांनी दिला.
पंचायत समिती सभागृहात तालुका कृषी निविष्ठा विक्रेत्यांची खरीप हंगाम पूर्वनियोजन व आढावा बैठक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख,मोहिम अधिकारी जमधडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीत खते, बी-बियाणे व औषधे यांचे भावफलक व साठाफलक लावणे, शेतकऱ्यांना अनावश्यक खतांची सक्ती न करणे,कृषी निविष्ठांची पक्की बिले देणे, खतांची जादा दराने विक्री न करणे,ई पॉस मशीन व गोडाऊन साठा तंतोतंत जुळणे याबाबत अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांना सूचना केल्या.या सूचनांचे काटेकोर पालन न केल्यास केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले,पंचायत समिती कृषी अधिकारी श्रीमती आर.जी.बोडके,प्रशांत आहेर,पोपटराव त्रिभुवन,विस्तार अधिकारी किरण मोरे,उमेश सूर्यवंशी आदींनी आढावा बैठकीत मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुका ऍग्रो डीलर्स असोशिएशनचे अध्यक्ष प्रदीप मुंदडा, दिनेश मुंदडा,नितीन काबरा,दिलीप मंडलेचा,अभिजीत काळे,जगन सोमासे, नारायण आव्हाड आदींसह तालुक्यातील वितरक व विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो -