उंदिरवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रभाकर चव्हाण बिनविरोध
उपाध्यक्षपदी त्र्यंबक क्षिरसागर यांची निवड
येवला : पुढारी वृत्तसेवा
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उंदिरवाडी विविध कार्यकारी सोसायटीत जनसेवा विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला असून आता सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रभाकर चव्हाण व उपाध्यक्षपदी त्र्यंबक क्षिरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोसायटीच्या निवडणुकीत जनसेवा विकास पॅनलचा सर्व १३ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.जनसेवा विकास पॅनलच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद दूर ठेवून आपली एकजूट दाखवत या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे.निवडणुक बिनविरोध करण्यासाठी जनसेवा विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पण विरोधक तयार नसल्याने प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जावे लागले होते.
त्यानंतर नव्याने अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी सोसायटीच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक झाली.यावेळी सर्वानुमते चव्हाण व क्षिरसागर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.बैठकीला नवनिर्वाचित संचालक दिगंबर जेजुरकर,कडूभाऊ क्षिरसागर,नितीन राजुळे,विश्वास सोनवणे,देविदास सोनवणे,राहुल सोनवणे,अशोक चाफेकर,तुकाराम गोराणे,शामराव झालटे,चंद्रकला जेजुरकर,लिलाबाई जाधव हे उपस्थित होते.
ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत सर्वांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी व सोसायटीच्या प्रगतीसाठी कामकाज करु असे आश्वासन यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष चव्हाण यांनी दिले.पॅनलचे प्रमुख सचिन कळमकर,मारुती जेजुरकर,नारायण राजुळे,बाळू सोनवणे,सुभाष देशमुख,अशोक जेजुरकर,आप्पा सोनवणे,हरिभाऊ चाफेकर,साखरचंद सोनवणे,बापू आहेर,संदीप देशमुख,योगेश देशमुख,रामदास राजुळे,अरविंद क्षिरसागर,माणिकराव देशमुख,शिवाजी जगझाप,दत्तात्रय सोनवणे,ज्ञानेश्वर राजुळे,मनोज जेजुरकर,डॉ.नाना क्षिरसागर,नारायण क्षिरसागर,रवी क्षिरसागर,राजेंद्र क्षिरसागर,बाळासाहेब क्षिरसागर,रबुभाई शेख,अरुण जेजुरकर,ओंकार जेजुरकर,तुळशीराम राजुळे,रघुनाथ मंडाळकर,बद्रीभाऊ क्षिरसागर आदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून सत्कार केला.
उंदिरवाडी : येथील सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रभाकर चव्हाण, उपाध्यक्षपदी त्र्यंबक क्षिरसागर यांची निवड झाल्यावर सत्कार