येवलेकरांना आता मिळणार पोदारचे
दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण
येवला - पुढारी वृत्तसेवा
शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना देखील सीबीएसई बोर्डेचे सर्वोत्कृष्ट शिक्षण मिळावे या उद्देशाने येथे भारतात नावलौकिक असलेल्या पोदार संकुलाचे
दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षनाची सुविधा उपलब्ध केली आहे.वेदांत फाउंडेशन अंतर्गत साई सिद्धी पोदार लर्न स्कुलची यावर्षीपासून सुरुवात होत आहे.पारेगाव येथे भव्य इमारत उभी राहिली असून यांतर्गत शैक्षणिक उपक्रम सुरू केल्याची माहिती संचालक डॉ.श्रीकांत काकड व प्रियंका काकड यांनी दिली.
येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ.काकड,सौ.काकड तसेच मातोश्री शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कुणाल दराडे यांनी साई सिद्धी पोदार लर्न स्कुलची माहिती दिली. गाव-खेड्यांमधील मुलांना उत्तम शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने पोदार एज्युकेशन नेटवर्कच्या माध्यमातून पोदार लर्न स्कूल हा शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमामार्फत देशातील जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये चांगले शिक्षण व सोयीसुविधा पुरविण्याचे काम करण्यात येत आहे. पोदार एज्युकेशन नेटवर्क भारतात २1९ स्कुल तर ३६० जम्बो किड्स सेंटर आहे. यातून १ लाख ८० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून ८०० शिक्षक या ग्रुप ला जोडलेले आहेत.
ऍक्टिव्हिटी तसेच स्किल बेस शिक्षणासाठी भारतात तसेच परदेशातही पोदार ग्रुप प्रसिद्ध आहे.शहरालगत सुरू झालेल्या साइसिद्धी पोदार लर्न स्कुल येथे प्ले ग्रुप ते आठवी पर्यंतचे सीबीएसइ बोर्डाचे शिक्षण उपलब्ध असून याकरिता उच्च शिक्षित व प्रशिक्षित शिक्षक तसेच डिजिटल क्लासरूम,ऍक्टिव्हिटी ग्राउंड,म्युजिक रूम, इनडोअर स्पोर्ट्स हब उपलब्ध आहे.पारेगाव रोड येथे येवला पासून १ किलोमीटर अंतरावर सुरक्षित तसेच निसर्गरम्य वातावरनात सर्व सोयी सुविधा युक्त इमारत असून विद्यार्थ्याना येण्या जाण्याकरिता बसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यास पोद्दार मार्फतच तयार केला जातो.शिवाय शिक्षकांना वर्षातून दोनदा प्रशिक्षण दिले जाते.त्यामुळे विद्यार्थ्यांना काय व कसे शिक्षण हवे या तत्त्वाने शिक्षक अध्यापन करतात.भारतातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळेस अभ्यासक्रम शिकविला जातो आणि विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्ञान या अध्यपनातून पोदार नेटवर्क देते.
येथे यापूर्वी कधीही न मिळालेले उच्च व अद्ययावत शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून त्या दृष्टीने प्राचार्य व सर्व प्रशिक्षित स्टाफची नेमणूक केल्याची माहिती यावेळी संचालक काकड यांनी दिली.शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.त्यामुळे पहिल्याच वर्षी आठवी पर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहे. भविष्यात बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा मनोदय त्यांनी या वेळी व्यक्त केला.
■१६ मे पासून ब्रिज कोर्स
कोरोनामुळे विध्यार्थ्यांची अभ्यासात कमी झालेली रुची आणि हानी भरून काढण्यासाठी १६ मे पासून पोदार स्कूल मध्ये ब्रिज कोर्स सुरू होत आहे.या ब्रिज कोर्सेमुळे विद्यार्थ्यांना बेसिक संकल्पना कळणार आहेत आणि जेव्हा ९ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू होईल, त्यावेळेस मुलांना शिक्षण घेण्यास कुठलीही अडचण निर्माण होणार नाही.
"ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शहराप्रमाणेच शिक्षन मिळावे या हेतूने आम्ही पोदार ग्रुप सोबत शाळा सुरू करीत आहोत.शिक्षणाबरोबरच संस्कार तसेच सर्वाणगीन विकासाकरिता शाळेत पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत.शिक्षकाना पोदार ग्रुप सोबत प्रशिक्षण देऊन आपल्या विद्यार्थ्याना अंतरराष्ट्रिय स्पर्धेकरिता तयार करावे असे आमचे स्वप्न असून त्याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहोत"
- डॉ.श्रीकांत काकड व प्रियंका काकड
संचालकसाइसिद्धी पोदार लर्न स्कुल,येवला