फुले,शाहू,आंबेडकरांच्या विचारधारेची वज्रमूठ करावी लागेल ज्ञानेश्वर दराडे : राजापूर येथे ग्रामस्थांकडून भव्य सत्कार




फुले,शाहू,आंबेडकरांच्या विचारधारेची वज्रमूठ करावी लागेल
ज्ञानेश्वर दराडे : राजापूर येथे ग्रामस्थांकडून भव्य सत्कार
 

येवला : पुढारी वृत्तसेवा
 बहुजन समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन फुले,शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून वज्रमूठ करावी लागेल त्याशिवाय समता व सामाजिक न्याय निर्माण होणार नाही असे प्रतिपादन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दराडे यांचा राजापूर येथे आज नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राजापूर सारख्या छोट्याशा खेड्या गावातील सर्वसामान्य तरुणाला जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली असून साहेबांनी टाकलेला विश्वास समतेच्या कामातून सार्थ ठरविण्याची ग्वाव्ही दराडे यांनी दिली. अगदी अल्प वयापासून चळवळीत काम करून आपल्या कामातून ओळख निर्माण करून दराडे यांनी जिल्हास्तरीय पदाला गवसणी घालून गावाची शान वाढविली असल्याचे सांगून तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण घुगे यांनी भुजबळाचे आभार मानले.
याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक आव्हाड,भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस दत्ता सानप,सरपंच वंदना सानप,उपसरपंच प्रकाश वाघ,वंचित बहुजन आघाडीचे नेते शिवाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.गोरख सानप, माजी सरपंच भारत वाघ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विश्वास सानप,संघटक गोकुळ वाघ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.यावेळी उपसरपंच प्रकाश वाघ,
माजी सरपंच व सदस्य सुभाष वाघ, आण्णासाहेब मुंढे,दामु सोनवणे,विजय ठाकरे,रमेश वाघ,पांडुरंग मुंढे,भिमराव वाघ,श्रीधर वाघ,निव्रृत्ती वाघ,शंकर अलगट,शरद वाघ,समाधान चव्हाण,
अश्पाक सैय्यद,गुलाब चंवडगीर,शिवाजी विंचु,संजय भाबड,बबन अलगट,विठ्ठल मुंढे,दादाभाऊ विंचु,बळीराम वाघ,
भाऊसाहेब बैरागी,सुभाष भाबड,
समाधान दराडे,चिंधा सानप,शिवाजी आव्हाड,शरद आगवण,अनिल वाघ, शिवाजी विंचू,प्रविण वाघ,सूरेश आगवण,
राजेद्र सानप,शंकर मगर,आर.एस.मंडलिक,दत्तु भालके.यासह राजापूर, सोमठाणे,पन्हाळसाठे,पिंपळखुटे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

राजापूर : समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर दराडे यांच्या सत्कार करताना ग्रामस्थ व पदाधिकारी
थोडे नवीन जरा जुने