भाजपा युवा मोर्चा तर्फे हिंदू नववर्षानिमित्त युवकांना हजार रामरक्षास्तोत्रचे वाटप
येवला : पुढारी वृत्तसेवा
हिंदू नववर्ष व गुढीपाडवा सणानिमित्त येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे शहरातील युवकाना एक हजार रामरक्षास्तोत्रमचे वाटप करण्यात आले.धर्माविषयी अभिमान वाढावा तसेच युवकांमध्ये संस्कृती रक्षण व चांगले गुण रुजावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेघराज यांच्यातर्फे हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.सर्वात पवित्र मंत्रांपैकी एक म्हणून रामरक्षास्तोत्र ओळखले जाते. यामध्ये धर्माभिमानींना वाईटापासून वाचवण्याची प्रचंड शक्ती आहे.यात एकूण ३८ श्लोक आहेत,याचा पाठ केल्याने एखाद्या व्यक्तीला निर्भय वाटले तर मानसिक शक्ती प्राप्त होते.हे अतिशय प्रभावी असे स्तोत्र आहे.रामरक्षा स्तोत्रचे नियमित पठण केल्याने आपले मन शांत राहते.जीवन निरोगी,समृद्ध व संपन्न होते.
आपल्याकडे हिंदू धार्मिक पौराणिक धर्म ग्रंथांत पूजा विधी करण्यास विशेष महत्व आहे.असे केल्याने मनाला शांती लाभते शिवाय,घरांत सकारात्मक उर्जा राहते या सर्व हेतूने युवकांना रामरक्षास्त्रोताचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे अनेक युवकांनी स्वागत केले असून याच्या वाचनाचे महत्व वाटप करताना देण्यात आल्याची माहिती मयूर मेघराज यांनी दिली.
शहरातील जोगवाडा,खत्री गल्ली, सहस्त्रार्जून चौक,मधली गल्ली,गांधी मैदान,खंडेराव मंदिर व विविध भागात मेघराज व शहर उपाध्यक्ष गणेश पवार, हेमंत सांबर,ललित वखारे,वैष्णव पवार जाऊन रामरक्षास्तोत्रमचे वाटप करण्यात आले.