*डॉ क्षत्रियांच्या संघाने जिंकला* डिपीएल ४ चषक

डॉ क्षत्रियांच्या संघाने जिंकला* डिपीएल ४ चषक 

,
अतिशय रोमहर्षक झालेल्या अंतीम सामन्यात डॉ चंद्रशेखर क्षत्रिय यांच्या क्षत्रीय स्ट्रायकर नी अंतीम षटकात सामना १० धावा राखुन जिंकला. 
डॉक्टरांचे वयक्तीक आरोग्य आणी आपापसातील हितसंबध वाढवण्यासाठी मागील चार वर्षापासुन  आयोजीत करण्यात येणाऱ्या डॉक्टर्स प्रीमियर लिग चे उद्घाटन दि २२फेब्रुवारी रोजी जेष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ रमेश तगारे यांच्या हस्ते करण्यात आले. साखळी स्वरुपात असणाऱ्या *पहीला सामना* डॉ सुशांत पाटील यांच्या   पाटील वॉरियर्स  आणी डॉ तुषार साळुंखे यांच्या साळुंखे स्ट्रायकर यात खेळण्यात आला डॉ पाटील वॉरियर्स यानी सुशांत पाटील जय करवा राहुल काकड अमीत गायकवाड संकेंत शिंदे गणेश सवलके सिताराम बैरागी यांच्या खेळाच्या जोरावर जिंकला. 
दुसरा सामना डॉ क्षत्रिय स्ट्रायकर आणी पाटील वॉरीयर्स यांच्यार खेळण्यात आला या क्षत्रीय स्ट्रायकर्स यानी प्रतीक जाधव संतोष जाधव गोवींद भोरकडे वैभव पटेल यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर जिंकला  
तिसरा सामना साळुंके स्ट्रायकर आणी   क्षत्रिय स्टायकर्स यात खेळण्यात आला साळुंके यांच्या संघाने अलंकार गायके अविनाश विंचु स्वप्नील जगताप  धनराज काटे माजीद फारुकी गणेश जेजुरकर राम खोकले तुषार साळुके यांच्या जोरावर जिंकला.
चौथा सामना पाटील वॉरीयर्स आणी साळुंखे स्ट्रायकर यांच्या खेळण्यात आला यात पाटील वॉरियर्स यांच्या संघाने रोहन पाटील शुभम सोनवणे शिल्पेश माळी उज्वल भागवत सागर पवार यांच्या जोरावर जिंकला साखळी सामन्यात धावगतीच्या जोरावर क्षत्रीय स्ट्रायकर आणी पाटील वॉरीयर्स यांच्यात रविवारी खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना क्षत्रिय स्टायकर्स यानी १२ षटकात ८७ धावा केल्या यात महेश्वर तगारे श्रीकांत काकड सचिन शर्मा अनंत बारे योगेश जेजुरकर चंद्रशेखर क्षत्रीय यानी उत्कृष्ट फलंदाजी केली तर संकेत शिंदे सचिन कुटे सिताराम बैरागी रोहन पाटील यानी कडक गोलंदाजी केली. धावाचा पाठलाग करताना जय करवा संजय जाधव अमित गायकवाड यानी चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला परंतु  गोविंद भोरकडे राहुल वाघ राहुल कदम अनंत बारे पटेल यांच्या कडक गोलंदाजी मुळे अंतीम षटकापर्यंत सामना पोहचला व अंतीम षटकामध्ये क्षत्रीय स्ट्रायकर्स यानी सामना जिंकला.
लिग मधील बक्षीसे .
मालीकेतील उत्कृष्ट गोलंदाज राहुल वाघ 
मालीकेतील १४ चेंडुत ६९ धावा करणारा उत्कृष्ट फलंदाज अलंकार गायके 
मालीकेतील अष्टपैलू कामगीरी विभागुन सागर  बोळे आणी महेश्वर तगारे 
उत्कृष्ट सहभागी संघ डॉ तुषार साळुंखे 
उपाविजेते डॉ पाटील वॉरीयर्स
चार लिग मधील ३ लिग जिंकणारे उत्कृष्ट कप्तान व संघनायक डॉ चंद्रशेखर  क्षत्रिय. 
सामन्याचे समालोचन अनंत खांगटे डॉ राजीव चंडालीया यानी केले तर चोख अंपायरींग अमोल पहिलवान  व विजय जाधव यानी केले. मालीकेतील बक्षीस वितरण जेष्ठ डॉक्टर संजय जाधव आणी डॉ रमेश तगारे यांच्या हस्ते करण्यात आले
थोडे नवीन जरा जुने