कंचनसुधा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

 
दि. 18 फेब्रुवारी 2020 मंगळवार कंचन सुधा इंग्लिश मिडीयम च्या प्रांगणात शिव जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या प्रसंगी कंचनसुधा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अजय जैन, उपाध्यक्ष श्री. अक्षय जैन, समन्वयिका डॉ. दर्शना जैन,  शाळेचे मुख्याध्यापक पी.एन.पांडा,उपमुख्याध्यापक एस.पी. भावसार उपस्थित होते. अध्यक्षाच्या हस्ते सरस्वती पूजन, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी इ. 6वी प्रांशु पावटेकर या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती. अथांग जाधव, प्रांशू  पावटेकर या विद्यार्थ्यांनी तर अदिती पायमोडे या विद्यार्थिनीने भाषण केले. राखी वसईकर यांनी भाषण केले. श्री.बापू आहेर यांनी धन्य धन्य शिवाजी पोवाडा सादर केला. संस्थेचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांची बुद्धिचातुर्य आणि गणीमिकावा विषयी विचार व्यक्त केले. शाळेचे  मुख्याध्यापकांनी शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य विषयी आपले विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कदम यांनी तर आभार प्रदर्शन चित्रा पाटील  यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतीक विभाग प्रमुख वर्षा जयस्वाल, राधिका पतंगे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी शाळेतिल सर्व शिक्षक-शिक्षकांनी भगव्या रंगाचे फेटे परिधान केले होते.
थोडे नवीन जरा जुने