मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागा मार्फत अंगुलगावं व न्याहारखेडे येथे चर्चा सत्र घेऊन प्रबोधन.

मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागा मार्फत अंगुलगावं व न्याहारखेडे येथे चर्चा सत्र घेऊन प्रबोधन. 
येवला : प्रतिनिधी

 येवला तालुक्यातील अंगुलगावं व न्याहारखेडे येथील शेतकरी बांधवांना  यांच्या शेतात मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळी या विषयावरील तालुका कृषी अधिकारी येवला  यांच्यामार्फत कृषि सहाय्यक जयश्री जाधव  यांनी चर्चासत्र /प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणात सुरुवातीला सर्व शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष मका पिकाच्या प्लॉटवर घेऊन पिकाचे निरीक्षण घेण्यात आले, या प्रशिक्षणात मंडळ कृषी अधिकारी सिद्दीकी यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व पिक विमा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच कृषी सहाय्यक जयश्री जाधव मॅडम  यांनी मका पिकावर येणाऱ्या लष्करी आळीचा जीवनक्रम अंडी ,अळी,कोश व पतंग या चार अवस्था असतात, नुकसान पातळी बरोबर या किडीची माहिती मादी ,पतंग मका, पिकात पोंग्यामध्ये एक हजार ते पंधराशे अंडी देते हे अंडी 100-150 च्या पुंजक्याच्या स्वरूपात देते, या अंड्यामधून तीन  दिवसांनी अळी बाहेर पडते, मका पिकांच्या कोवळ्या पोंग्यावर आपली उपजीविका करते, त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात ,नंतरच्या अवस्थेत मका मोठी होऊन मका पिकाची पाने मोठ्या प्रमाणात खाऊन त्यावर विस्टा टाकते ,यानंतर आळी चे नियंत्रण न झाल्यास ती आपली उपजीविका मक्याच्या तुऱ्यावर करून मक्याचे कणीस कोवळा भाग खाते त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट येते.

अमेरिकन लष्करी आळी चा नियंत्रण एक नंबर बियाण्यास पेरणीपूर्वी रासायनिक औषधे व जैविक बीज प्रक्रिया करावयाची उपायोजना यावर माहिती दिली तसेच मका उगवणीनंतर निंबोळी अर्क ची फवारणी याबाबत माहिती दिली तसेच रासायनिक फवारणी साठी औषधांची माहिती दिली तसेच मका पिकात पक्षी थांबे ,लाईट ट्रॅप ,व कामगंध सापळी लावण्यात यावी याबद्दल माहिती देऊन सदर चर्चासत्रामध्ये  भाऊसाहेब पाटोळे कृषी पर्यवेक्षक  यांनी हुमणी किड नियंत्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमास संजय मोरे साहेब यांनी प्रस्तावना केली व सोपान जगझाप यांनी आभार प्रदर्शन केले जाधव मॅडम कृषि सहाय्यक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते .या कार्यक्रमासाठी शेतकरी संघटनेचे श्रावण देवरे,अरुण जाधव, परमानंद जाधव, कृष्णा जानराव, मुलतानी,सुभाष देवरे, उज्ज्वला जगझाप  यासह मोठया संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
******************


फोटो... येवला तालुक्यातील न्याहारखेडे येथे चर्चासत्र/प्रशिक्षण कार्यक्रमात मका पिकावरील लष्करी आळी नियंत्रण याविषयी सविस्तर माहिती देताना कृषी सहाय्यक जयश्री जाधव .
थोडे नवीन जरा जुने