विद्युत पोलवर कृतिम रोषनाई करुन शिवसेने तर्फे येवले न पा विद्युत विभागाचा निषेध
येवला : प्रतिनिधी
गेली अनेक दिवसा पासुन काळा मारुती चौक येवला,येथील वर्दळ असलेल्या ठिकाणी येवले न पा चे एल ए डी हैलोजन बल्प बंद असल्याने परिसरात अंधाराच साम्राज्य निर्माण झाले असुन यामुळे अनेक चोरी मारी सारख्या घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक दिवस एलएडी बल्ब बंद असुनही येवले नगरपरिषद चा विद्युत विभाग बघ्याची भुमिका घेत असुन या निषेधार्त परिसरातील नागरीकांसह शिवसेनेने विद्युत पोलवर मेनबत्त्या लाऊन कृतिम रोषनाई द्वारे येवले न पा च्या विद्युत विभागाचा निषेध केला यावेळी शिवसेनेचे धिरजसिंग परदेशी ,राहुल लोणारी ,अझहर शहा व नागरीक उपस्थित होते