श्री विठ्ठल मंदिर संस्थान येवले येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न
येवला : प्रतिनिधी
येथील पुरातन अशा श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दि. ६ ते दि. १३ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. आषाढी एकादशीचे दिवशी पहाटे हरिहरभक्त व सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे व त्यांच्या पत्नी नगरसेविका तथा मर्चन्ट्स बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्षा पद्मावती शिंदे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. सप्ताह काळात काकड-आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, महिला मंडळ भजन, प्रवचन, हरिपाठ व कीर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह काळात अल्पोपहार व भोजनाच्या रुपात अनेक दात्यांनी अन्नदान केले. प्रवचन मलिकेत ह. भ. प. प्रसादशास्त्री कुलकर्णी, अविनाश पाटील, घनश्याम पैठणकर, रामेश्वरशास्त्री मिश्रा, डॉ. निलेश आहेर, प्रभाकर झळके यांनी ज्ञानेश्वरीवर प्रवचने केली. कीर्तन मालिकेत ह. भ. प. सुवर्णाताई जमधडे, राधेश्याम गाढे, जालिंदर शिंदे, प्रकाश पोटे, अनिल जमधडे, देविदास ढोकले, निवृत्ती चव्हाण यांची कीर्तने झाली. शनिवारी दि. १३ रोजी ह. भ. प. गोरख महाराज काळे यांचे काल्याचे कीर्तन झाले. यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. सप्ताहासाठी श्री विठ्ठल मंदिराच्या भजनी मंडळातील ह. भ. प. अशोक शिंदे, काकासाहेब शिंदे, रंगनाथनाना पाटोळे, किशोर रास्कर, रावसाहेब शिंदे, संजय राऊळ, मधुकर जगताप, दिनकर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थानचे ट्रस्टी दिीप पाटील, वसंत संत यांनी नियोजन केले. सतिष संत, अनंत संत, रोहित पाटील, अमित पाटील, अभिजित संत, कुशल संत, योगेश मनवेलीकर, निखिल काळकुंद्री, विकास धर्माधिकारी, गणेश काटवे, संतोष भावसार यांनी स्वयंसेवकांचे काम केले. सर्व भाविकांच्या सहकार्याने सप्ताह उत्साहात व आनंदात संपन्न झाला.