बच्चु भाऊंच्या वाढदिवसा निमित्त प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शैक्षणिक दृष्ट्या एक वर्षासाठी मुले घेतले दत्तक
येवला : प्रतिनिधी
बच्चु भाऊंचा वाढदिवस हा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त तळवाडे येथील मुलांना दत्तक घेण्यात आले त्यावेळेस त्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले व एक वर्षासाठी हे आदिवासी मुले दत्त घेण्यात आली. भाऊंच्या वाढदिवसा निमित्त एक आगळावेगळा कार्यक्रम सहा जुलैला घेण्यात आला या कार्यक्रमाचे कौतुक संपूर्ण येवला तालुक्यात होता आहे. या कार्यक्रमाला उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक उपजिल्हा प्रमुख संतोष थोरे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख अमोल फरताळे ,सचिन पवार ,शंकर गायके , अशोक गावडे, बाबासाहेब पाठे, रुपम भांबरे ,श्रीकांत कायस्थ,इत्यादी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.