येवल्यात कॉंग्रेस च्या वतीने तहसील कार्यालयावर टाळ नाद आंदोलन






येवल्यात कॉंग्रेस च्या वतीने तहसील कार्यालयावर  टाळ नाद आंदोलन 
 येवला -प्रतिनिधी
तालुका कॉंग्रेस पार्टीच्या वतीने  तहसील कार्यालयावर  टाळ नाद आंदोलन करण्यात आले भाजप सरकारने भूल थापा देत सत्ता काबिज केलि मात्र ईंधन दर वाढ ,शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप तसेच वाढती महागाई,आदि सह अनेक निर्णय धोरणा अभावी निकालात निघाले नाही भ्रष्टाचारा मुळे मालाड,मुंबई,पुणे,तसेच तीवरे धरण फुटुन बळी गेलेल्या दोषींवर कड़क कारवाई करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना अनेक बँका पिक कर्ज नाकारत आहे शेती मालाला हमी भाव नाही त्याच प्रमाणे केंद्र सरकारने अर्थ संकल्पात पेट्रोल व् डिझेल वर कर लावण्याची घोषणा करताच झालेली दर वाढ सर्व सामान्य नागरिकांची होणारी आर्थिक ओढातान अश्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहे तरी सरकारने वेळीच दखल घेत शेतकर्यांची ,नागरिकांची ओढ़ातान  थांबवावी या सरकारला जागे करण्यासाठी टाळ नाद आंदोलन करण्यात आले व तहसीलदार रोहिदास वारुळे याना निवेदन देण्यात आले या प्रसंगी तालुका अध्यक्ष  समीर देशमुख ,जेष्ठ नेते बाळासाहेब मांजरे,सुरेश गोंधळी ,जिल्हा उपाध्यक्षा रश्मी ताई पालवे,प्रा अर्जुन कोकाटे,नंदकुमार शिंदे,बळीराम शिंदे,नानासाहेब शिंदे,संदीप मोरे ,राजेंद्र गनोरे,सुकदेव मढ़वाई अमोल फरताले आदि उपस्थित होते  
थोडे नवीन जरा जुने