एकात्मिक किड व्यवस्थापन तंञाने करा पिकांचा बचावःशिवारफेरीद्वारे कृषि विभागाची जनजागृती

एकात्मिक किड व्यवस्थापन तंञाने करा पिकांचा बचावःशिवारफेरीद्वारे कृषि विभागाची जनजागृती.        
 जळगांव नेऊरः वार्ताहर
कमी उत्पादन खर्चात येणारे एकमेव नगदी पिक म्हणजे मका.परंतु चालु हंगामामध्ये परिसरातील मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने माञ हैदोस घातलेला आढळुन येत आहे.त्यामुळे शेतकरी राजाचे गणित पुरते बिघडलेले दिसुन येत आहे.कृषि विभागातर्फे येथील भड वस्तीवर प्रत्यक्ष शिवारात जाऊन जनजागृती करण्यात आली.एकात्मिक किड व्यवस्थापन तंञाच्या सहाय्याने यावर मार्ग काढता येऊ शकतो,तसेच शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता मका पिकामध्ये कृषि विभागाने सुचविल्याप्रमाणे औषधे फवारणी बरोबरच कामगंध सापळे,प्रकाश सापळे त्याचप्रमाणे पक्षांना बसण्यासाठी पक्षीथांबे तयार करावे.याबरोबरच शेतकऱ्यांनी रोजच्या रोजच्या  आपल्या पिकाचे निरीक्षण करावे.असे कृषि विभागाचे पाटोदा गटाचे कृषि पर्यवेक्षक भास्कर नाईकवाडे यांनी सांगितले.तसेच कृषि सहाय्यक साईनाथ कालेकर यांनी  अमेरिकन लष्करी अळीच्या विविध अवस्था ह्या कशा असतात हे  प्रत्यक्ष मका पिकाच्या शेतात जाऊन दाखविण्यात आले.यावेळी खंडेराव जाधव,बाळु सोनवणे,परसराम दरगुडे,उमाजी पवार,रमेश तांबे,उत्तम गवंडी,भाऊसाहेब सोनवणे ,दत्तु सोनवणे,किसन भड,मधुकर भळसाने,उत्तम भड,शांताराम सोनवणे ,भावराव जाधव,वाल्मिक खाडे,संजय जाधव यांसह शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


जळगांव नेऊरः मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या नियंञणासाठी शिवार फेरीद्वारे शेतकऱ्यांची  जनजागृती करतांना पाटोदा गटाचे कृषि पर्यवेक्षक भास्कर नाईकवाडे,कृषि सहाय्यक साईनाथ कालेकर व उपस्थित शेतकरी.(छायाः राधु शिरसाठ)
थोडे नवीन जरा जुने