नैसर्गिक आपद्ग्रस्तास रूपचद भागवतांनी दिला मदतीचा हात
येवला : प्रतिनिधी
6 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यात येवला तालुक्यातील डोंगरगाव येथील बाळू छगन सोमासे यांचे घराचे फार मोठे नुकसान झाले घरावरील पत्रे उडून जाऊन घराच्या भिंती कोसळून पडल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु घर पडून गेले, पत्रे उडून गेली आणि संसार उघड्यावर पडला. गावातील शिवसेनेच्या तरुण युवकांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपून आर्थिक मदतीचा हात दिला. येवला पंचायत समितीचे उपसभापती तथा शिवसेना येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे संघटक मतदार संघाचे संघटक रूपचंद भागवत यांना या आपत्तीची वार्ता समजताच पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि घराचे बांधकामास मदत म्हणून रुपये 10 हजारचा मदतीचा हात सदर कुटुंबास दिला आहे. बाळू छगन सोमासे यांचे वडील छगन सोमासे, आई शांताबाई सोमासे, मुलगा गजानन सोमासे विलास सोमासे, पत्नी अलका सोमासे, मुलगी दिपाली सोमासे असा परिवार आहे. यावेळी पारसनाथ सोमासे, प्रा.विलास भागवत सर, संदीप वाडकर, दत्ता जेजुरकर, एकनाथ भालेराव पांडुरंग शेळके ज्ञानेश्वर भागवत संतोष गोरे, विकास चव्हाण, दत्तू मोहन, सुशील पवार, संतोष सोमवंशी, क्रुष्णा पवार, सागर सोमासे,राहुल सोमासे,समाधान सोमासे,ज्ञानेश्वर सोमासे ,संतोष रोठे,बाजीराव कटके, साईनाथ ढोकळे गणेश सोमासे,सागर मोहन आणी ग्रामस्थ उपस्थित होते .