दुष्काळाची दाहकता .... जनावरे सांभाळणे कठीण-चारा पाणी टंचाई

दुष्काळाची दाहकता ....
जनावरे सांभाळणे कठीण-चारा पाणी टंचाई

येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील ममदापूर परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून जनावरांना चारा मिळेल कठीण झाले आहे यामुळे जनावरांना शेतातील वाळलेल्या झाडाचा पाला खावा लागत आहे .
येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात तालुक्याच्या शेवटच्या टोकाला औरंगाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेले ममदापुर गावाला सध्या मोठ्या पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे, या भागात कुठल्याही प्रकारची पाणी योजना नसून कोणताही मोठा कालवा बंधारा नाही त्यामुळे ममदापुर गावाला नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाईला ची  सुरुवात होते
ममदापूर येथील मेळणाचा बंधारा लवकर व्हावा अशी येथील शेतकऱ्यांना आशा होती पण कामाचे टेंडर निघून दोन वर्ष झाली तरी अजून पर्यंत काम सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे त्यातच आता पशुधन जगविण्यासाठी चारा पाणी कोठून आणावा हा प्रश्न पशु पालकांना भेडसावत आहे त्यामुळे नाईलाजाने पशूच पशुपालक बाहेरगावी चारा पाण्याच्या शोधात जनावरांचे जात आहेत किंवा जनावरांना शेतात सोडून तेथे वाळलेल्या काटेरी झाडांसह इतर वाळलेले गवत ही जनावरे खात आहेत


 शासनाने लवकरात लवकर  ममदापुर येथील मेळनाचा बंधारा पूर्ण करावा जेणेकरून  याभागातील पाणीप्रश्न कायमचा सुटेल-दिनेश राऊत,ग्रामस्थ ममदापुर


सध्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू आहेत मात्र जनावरांना पिण्याचे पाणी व चारा कुठून आणावा हा भीषण प्रश्न सध्या ममदापूर परिसराला भीषण भेडसावत आहेत- प्रकाश वनसे ,पशुपालक ममदापूर
थोडे नवीन जरा जुने