येवल्याच्या मराठा संघटन परिषेदेच्या वतीने सागर चव्हाणला रसवंती गृहची भेट.
२०१९ मध्ये मराठा संघटन परिषद करणार रोजगार निर्मिती प्रयत्न.
येवला : प्रतिनिधी
येथील मराठा समाजाच्या संघटन परिषदेने मागील वर्षी अश्विनी शेलार या विद्यार्थ्यांनीची विभागीय सायकल स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता परंतु पुढील स्पर्धेसाठी मदतीची गरज हवी होती म्हणून त्या मुलीला ४५००० हजाराची सायकल घेऊन दिली होती त्याच प्रमाणे प्रा.प्रवीण निकम,पांडुरंग शेळके व सुदाम पडवळ यांनी त्यांच्या संकल्पनेतून सागर चव्हाण या मुलाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला रसवंती गृह टाकून देण्यात आले.येवल्याच्या एस. एन. डी. कॉलेज मध्ये मोठ्या थाटामाटात मंगळवारी उद्घाटन झाले.आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते या शिवबा रसवंती ग्रूहाचे उद्घाटन करण्यात आले.प्रमुख उपस्थिती म्हणून माणिकराव शिंदे,संभाजी पवार रुपेश दराडे,रतन बोरणारे,विठ्ठल अठराशे आदी मान्यवर उपस्थित होते तर सागर प्रमाणेच समाजातील इतर होतकरू मुलांसाठी छोटे मोठे व्यवसाय या २०१९ मध्ये सुरू करून देणार असल्याचे शेळके,निकम व पडवळ यांनी सांगितले.यावेळी प्रवीण आहेर,विकी गायकवाड, दत्ता गायकवाड,अजय लहरे,सागर रानवडे, रजनीकांत मोगल,केतक जगताप, कुणाल पवार,वैभव गायकवाड,अर्जुन गायकवाड,सुरज शिंदे आदी मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी- शिवबा रसवंती गृहाचे उद्घाटन करताना आमदार नरेंद्र दराडे,माणिकराव शिंदे,संभाजी पवार,रुपेश दराडे,पांडुरंग शेळके प्रवीण निकम सुदाम पडवळ.
गेल्या काही वर्षा पासून पाहतोय पांडुरंग शेळके व प्रवीण निकम यांची पूर्ण टीम ज्या पद्धतीने काम करत आहे की त्या गोष्टीची समाजाला अत्यंत महत्त्वाची गरज आहे हा प्रयत्न जरी छोटा असला तरी येणाऱ्या काळात मोठा बदल घडवून आणतील हे माझ्यासह संपूर्ण तालुक्याला माहीत आहे.
ऍड माणिकराव शिंदे नेते राष्ट्रवादी काँग्रेस येवला