कंचन सुधा इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये नववर्षांचे स्वागत हर्षोल्हासात
येवला:- प्रतिनिधी
कंचन सुधा इंग्लिश मेडियम स्कुल, मध्ये नविन वर्षाचे स्वागत सुंदर पद्धतीने करण्यात आले. संपुर्ण विद्यालय विविध रंगीत शुभेच्छा कार्ड व फुगे यांनी सजविण्यात आले होते. सर्व शिक्षकांनी नववर्षाचा शुभेच्छा देत सर्व विद्यार्थाचे स्मित हास्य मुद्रेत शाळेत स्वागत केले.
संगीतावर आधारीत सुमधुर स्वागत गिताद्वारे विद्यार्थानी प्रमुख पाहुण्यांचे व सर्वांचे स्वागत केले. पुर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील मुलामुलींनी नृत्य सादरीकरणातुन उपस्थितांची मने जिंकली. पुर्व प्राथमिक विभागातील मुलांनी काव्य गायन सादर केले. तर माध्यमिक विभागातील कु. पियूष म्हस्के याने हिंदी कविताद्वारे नव वर्षाचे महत्व सादर केले. निलेश होन, व राजेंद्र बोर्डे यांनी मुलांना नववर्षांचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कैलास ढमाले यांनी केले तर आभार प्रदर्शन स्मिता कुलकर्णी यांनी केले. प्राचार्य पि. एन. पांडा सर व उपप्राचार्य सागर भावसार यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे नववर्षांचे स्वागत आनंदात व हर्षोल्हासात करण्यात आले.
शाळेचे संस्थापक अजय जैन व समन्वयक अक्षय जैन यांनी विद्यार्थ्यांंचे कौतूक केले.