८० शिवसैनिक अयोध्येत तर येवल्यात वनवासी राम मंदिरात महाआरती



८० शिवसैनिक अयोध्येत तर येवल्यात वनवासी राम मंदिरात महाआरती

 


येवला  : प्रतिनिधी

 'जय श्रीराम', 'जय भवानी, जय शिवाजी', असा जयघोष करत हजारो शिवसैनिक अयोध्येत पोहोचले असून,येथील सुमारे ८० शिवसैनिक अयोध्येत आज सकाळीच दाखल झाले आहेत.तर आज सायंकाळी येथील युवा शिवसैनिकानी येथील वनवासी राम मंदिरात महाआरती केली.

आज सायंकाळी सहा वाजता आयोध्यातील राम मंदिर समर्थनार्थ गंगादरवाजा येथील वनवासी राम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व हिंदूत्ववादी संघटनेचे पदाधिकारी,रामभक्त उपस्थित होते.

राम मंदिरातील आरती आमदार किशोर दराडे,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संभाजीराजे पवार,नगराध्यक्ष बंडु क्षिरसागर, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी आदीच्या यांच्या हस्ते झाली.यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.भास्कर कोंढरे राहुल लोणारी,नगरसेविका सरोजनी वखारे,नगरसेवक रुपेश लोणारी,दिपक भदाणे,महेश सरोदे,अरुण काळे,शैलेष देसाई,युवा सेनेचे शहर संघटक लक्ष्मण गवळी,तालुका संघटक प्रज्वल पटेल,मुन्ना माडीवाले,भुषण मांडवडे,संतोष बांगर,चेतन लोणारी,प्रल्हाद कवाडे, गिताराम दारुणकर,मकरंद तक्ते,कुणाल कदम,मुन्ना पाटिल,दिलीप मेंगळ,सतिष कायस्थ,योगेश देशमुख,विठ्ठल नागपुरे,प्रतिक जाधव,रोहीत लोणारी,ज्ञानेश्वर वखारे,सुभाष शिरसाठ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने