मारवाडी गुजराथी मंच तर्फे येवला येथील अकरा व्यक्तींना समाज भुषण पुरस्कार जाहीर
येवला : प्रतिनिधी
आखील भारतीय मारवाडी गुजराती मंच तर्फे आयोजित केलेल्या राज्य स्तरीय समाज भुषण पुरस्कार सोहळा रविवार रोजी 4 नोव्हेंबर ला नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे ,
गेल्या तिन वर्षापासून हा पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींना देण्यात येतो .
राजकीय , सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्यां मध्ये
सत्कार्थी म्हणून
राज्यस्तरीय पुरस्कार-किशोर दराडे, उषाताई शिंदे, अल्केश कासलीवाल, अरुनमामा थोरात, विभागीय पुरस्कार-महेंद्र काळे , हर्षाबेन पटेल ,पी एस आय नरेंद्र खैरनार,
निसार लिंबुवाले, प्रमोद पाटील, सुनील खरे, बंडू क्षीरसागर
आदींना समाज भुषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती आखिल भारतीय मारवाडी मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष अजित बागमार यांनी दिली,
येवल्याचे उद्योजक अल्केश कासलीवाल यांना राज्य रत्न पुरस्कार अखिल भारतीय मारवाड़ी गुजराती मंच च्या वतीने जाहीर झाला आहे.यांची ही निवड अखिल भारतीय मारवाड़ी गुजराती मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष उद्योजक अजित बागमार व त्यांच्या
पदाधीका-यांनी केली
या सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक व ग्रामीण विकास राज्यमंत्री दादा भूसे हे करणार आहे.
ह्या सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून येवला येथील आमदार नरेंद्र दराडे , मा.समाज कल्याण मंत्री बबन घोलप,मा.आरोग्य राज्यमंत्री शोभाताई बच्छाव,ओझर चे आमदार अनिल कदम,शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे ,आमदार सुधीर तांबे,मा.आमदार कल्याण राव पाटील,मा.आमदार नरेंद्र दराडे,जि.प.अध्यक्षा( नासिक) शीतल सांगळे,स्थायी समिती अध्यक्षा( नासिक)
हीमगौरी आडके यांच्या सह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.