भागवत बंधूनी दिला मदतीचा हात
येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील राजापूर येथे मागील महिन्यात जळीत झालेले अलगट वस्ती जवळ सोनतळा येथील कूटूब नामदेव भोरू ठाकरे यांना श्री नारायणगिरी महाराज फाउंडेशन व येवला प.स.उपसभापती
रुपचंद रामचंद्र.भागवत यांनी वडिलांप्रमाणे घर जाळित पीड़ितांना केली संसारउपयोगी वस्तूची मदत. मागील महिन्यात राजापूर, ता. येवला येथील गरीब शेतमजूर नामदेव भोरू ठाकरे यांचे झोपडिचे घराचे जळीत झाले. ठाकरे यांचे कुटुंब हे मोल मजूरी करतात घरातील संपूर्ण भांडे, धान्य, कपडे, डाग, रोख रक्कम तसेच घरातील सर्व तदंगभूत वस्तु जळुन खाक झालेल्या आहे. ठाकरे कुटुंबाचे अंगावरील कपडे सोडून घालण्यासाठी कपडे शिल्लक राहिलेले नाही. स्वयंपाकासाठी व जेवणासाठी एकही भांडे राहिलेले नाही. धान्य, डाळी सर्व जळुन खाक झाले असून ठाकरे यांचा संसार कुटुंबासह उघड्यावर पडलेला आहे. शासन, सेवाभावी संस्था तसेच तालुक्यातील दानशूरांनी पुढे येवून करता येईल त्या स्वरूपात ठाकरे यांना मदत करुन धीर देण गरजेचे आहे. सदर कुटुंबावर खूप मोठ संकट आलेले आहे.
येवला पंचायत समिती उपसभापती यांना या घटनेची माहीती मिळताच त्यांनी घटणास्थळी धाव घेतली. जळीताची परिस्थिती पाहून ते अवाक झाले. ठाकरे यांचे कुटुंबांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर उपसभापती यांनी तहसीलदार सो येवला यांना जळीत घटनेची माहीती फोनद्वारे दिली व शासकीय पातळीवर योग्य करवाई, पंचनामा करून शासकीय मदत मिळवून देणे कमी शासनाकडे पाठपूरावा करने कामी कळविले आहे.. तसेच श्री नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिक अध्यक्ष विष्णुजी रामचंद्र भागवत यांचे माध्यमातुन ठाकरे यांचे कुटुंबास आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणार असल्याचे उपसभापती रूपचंद भागवत यांनी सदर कुटुंबाचे सांत्वन करतेवेळी सांगितले होते
त्यानुसार उप सभापती रूपचंद भागवत यांनी आज दि 28/11/2018 रोजी सदर ठाकरे कुटुंबासाठी शासनाची काय, केव्हा मदत मिळेल याची वाट न पाहता नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिक अध्यक्ष विष्णूजी रामचंद्र.भागवत यांचेवतीने रूपचंद भागवत यांचे हस्ते स्वखर्चाने ठाकरे कुटुंबासाठी प्राथमिक संसारउपयोगी वस्तु-धान्य/किरणा- 1 क्विन्टल बाजरी, 1 क्विन्टल गहू, 15 किलो तांदूळ, 10 किलो तूरडाळ, 5 लिटर गोड्तेल, 2 किलो हरभरा डाळ, 2किलो शेंगदाणे, 2किलो साखर, 1किलो बेसनपीठ, 1किलो गुळ, 1किलो शाबूदाना, चहा पावडर, मसला, हळद, मिरची, जिरे, साबण, निरमा पावडर, खोबरेल तेल, मिठपुड्या, तसेच भांडे- 1हंडा, कळशी, स्टील टाकी, 3पातीले, कढ़ाई, तवा, 5 ताट, 5 तांबे, वाट्या, प्लेट, ग्लास, डबे, बादली, सांडशी, किसणी, जग, तेल किटली, खलबत्ता, पोळीपाट, लाटणे, विळी, उचटनी, झारा, भातोडी, तवा, सांडशी, मोठा चमचा, 5 लिटर कुक्कर, चाळणी, 6 कपबश, चहा गाळण, चमचे, देव तांब्या / ताट, दिवा याप्रमाणे वस्तु देवून ठाकरे कुटुंबास धीर दिला. येवला तालुक्यात केव्हाही कोठेही असे अपघात घडतात त्यावेळी रूपचंद भागवत लगेच तातडीने घटणास्थळी जावून पीड़िताना मदत करतात . भागवत बंधूनी ठाकरे कूटंबाला तीन ते चार महिने पूरेल इतकी मदत केली आहे यावेळी
रुपचंद भागवत, शिवसेना संघटक, येवला लासलगाव विधानसभा, उपसभापती पंचायत समिती येवला, सर्जेराव सावंत संघटक, शिवसेना दिडोरी, धिरजसिंग परदेशी, समन्वयक, संजय सोमासे ,रावसाहेब नागरे, रमेश फरताळे, राहुल लोणारी, नाना भड, आबासाहेब जाधव, उत्तम घुले, विकास साताळकर, आशिष अनकाईकर, समाधान चव्हाण,लक्ष्मण घूगे ,शंकरराव अलगट, अनिल अलगट ,भाऊसाहेब बैरागी, ज्ञानेश्वर भागवत,प्रसिद्धी प्रमुख एकनाथ भालेराव, समाधान आव्हाड, पप्पू बोडखे, राजेन्द्र सानप , अशोक आव्हाड, ,संतोष मूडे , आप्पासाहेब भागवत ,मनोज भागवत, अलताफ शेख,महेश दराडे,अमोल अलगट, महेश निकूले, आदी ग्रामस्थ उपस्थित होते