बँक परिसरात पाळत ठेऊन वृद्धांची फसवणूक करणारी टोळी गजाआड

बँक परिसरात पाळत ठेऊन वृद्धांची फसवणूक करणारी टोळी गजाआड


येवला : प्रतिनिधी
बँक परिसरात टेहळणी करत फिरायचे आणि एखादा वृद्ध त्याठिकाणी दिसला की मदतीसाठी म्हणून जायचे आणि त्या वृद्धाला फसवून त्याचेजवळची रक्कम घेऊन पसार व्हायचे.  असे अनेक वृद्धांना फसवून गुन्हे गुन्हे करणारी टोळी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. 
ता. 26 सप्टेंबर रोजी दुपारचे सुमारास सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील वयोवृध्द शेतकरी
शिवाजी दशरथ शेळके यांनी नांदूर शिंगोटे येथील बँक ऑफ महाराट्र येथून ७३ हजार रोख रक्कम काढली.  बँकेतुन बाहेर येताच त्यांना एक अनोळखी इसम भेटला, व त्यांना म्हणाला की मला माझे पाहुण्यांना ७५ हजार रूपये द्यायचे आहे, माझेकडे २ लाख रूपये असुन सर्व दोन हजार रूपयांच्या नोटा आहे, तरी तुम्ही मला थोडयावेळाकरीता तुमचेकडील ७३ हजार रूपये द्या व माझेकडील २ लाख रूपये तुमचेकडे ठेवा, असे बोलुन सदर अनोळखी इसमाने फिर्यादीकडुन ७३ हजार रोख घेवुन फसवणुक केली होती. सदर बाबत वावी पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.  त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बँक आवारातील सी.सी.टी. व्ही.फुटेजची पडताळणी केली,  त्यानुसार तपासाचे चक्र फिरवून मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे येवला तालुका परिसरातुन संशयीत इसम नामे राहुल
रविंद्र नागरे, (वय 31) रा. मातुलठाण, ता.येवला यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले इसमास विश्वासात घेवुन चौकशी केली असता, त्याने गेले हप्ताभरापुर्वी त्याचे नाशिक येथील इतर साथीदारांसह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.  त्यानुसार पोलिसांनी नाशिक शहरातील अन्य दोघे  बाळु राजाराम बोरकर, (वय 34) रा. श्रमिकनगर, सातपुर, ज्ञानेश्वर उर्फ नाना नामदेव पोमनार, (वय 29) रा. सदगुरूनगर, सातपुर यांना सातपुर परिसरातुन ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपीकडून  गुन्हयात वापरलेली स्पार्क कार क्र.एचएच ०४-ईएफ-३६४८ ही जप्त करण्यात आली आहे 
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, पोहवा रविंद्र वानखेडे, प्रकाश चव्हाणके, दिलीप घुले, सुधाकर खरोले, पोना प्रितम लोखंडे, रावसाहेब कांबळे, भरत कांदळकर, पोकॉ भाउसाहेब टिळे, किरण काकड, निलेश कातकाडे, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, संदिप लगड यांचे पथकाने नाशिक शहर व येवला परिसरातुन सदर आरोपीतांना ताब्यात घेवुन वरील गुन्हा उघडकीस आणलेला आहे
थोडे नवीन जरा जुने