विश्वजित लोणारीची राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
येवला : प्रतिनिधी
कै. धोंडीराम वस्ताद तालमीचा उदयोनमुख शाळकरी युवा मल्ल तथा येवला शहरातील 'डी पॉल' इंग्लिश मेडियम स्कूलचा विदयार्थी विश्वजित प्रविण लोणारी याने नुकत्याच नंदुरबार येथे झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या ७५ किलो वजन गटातील 'फ्रीस्टाईल' विभागातील अंतिम कुस्तीत प्रथम क्रमांक पटकावला. त्याची राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलात दोन दिवस स्पर्धा संपन्न झाली. नाशिक जिल्हा संघाच्या येवला येथील विश्वजित प्रविण लोणारी याने अंतिम फेरीच्या प्रेक्षणीय कुस्तीत चपळाई,आक्रमकता व डावांच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. तर, 'डी पॉल' शाळेचाच विदयार्थी इंद्रजित प्रवीण लोणारी याने १४ वर्षांखालील मुलांच्या ६८ किलो वजन गटात
उपविजेतेपद पटकावले.
विश्वजित लोणारी यास धोंडीराम वस्ताद तालीम संघाचे अध्यक्ष तथा 'उपमहाराष्ट्र केसरी' वस्ताद राजेंद्र लोणारी, महाराष्ट्र चॅम्पियन विजय लोणारी,रामेश्वर भांबारे,दिपक लोणारी,प्रविण लोणारी यांच्यासह 'डी पॉल' शाळेचे प्राचार्य जोमी जोसफ, उपप्राचार्य फादर सॅंडो थॉमस, क्रीडा शिक्षक लकी सर,सचिन पगारे यांचे मार्गदर्शन लाभले.