नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिक यांची मुकेश ला उपचारासाठी मदत.
येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील धुळगाव येथील मॅकेनिक डिप्लोमा ला दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या मुकेश उत्तम शिंदे हा गरीब कुटुंबातील युवक आजाराने ग्रस्त होता त्यास पुढील उपचारासाठी शिवसेना येवला लासलगाव विधानसभा व नारायनगिरी महाराज फाउंडेशन नाशिक तर्फ शिवसेना उपसभापती रुपचंद भागवत यांनी रुपये 15 हजार रुपयांची मदत केली,धुळगाव येथील गरीब शेतकरी कुटुंबातील मुकेश पुरुषोत्तम शिंदे हा उचशिक्षित आहे. तो आजाराने ग्रस्त होता. त्याला पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. नुकतीच धुळगाव येथे कुटुंबाची भेट घेऊन नारायनगिरी महाराज फाउंडेशन चे आद्यक्ष विष्णुजी भागवत यांच्या तर्फे उपसभापती रुपचंद भागवत यांनी ही आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी धुळगावचे सरपंच कैलास आबा खोडके,उपसरपंच माणिक सुर्यवनशी, अप्पासाहेब गायकवाड, आण्णासाहेब गायकवाड,राजेंद्र गायकवाड,एकनाथ गायकवाड (काँग्रेस सदस्य),नवनाथ खोडके (उपतालुका प्रमुक शिवसेना),गोरख गायकवाड,(शाखाप्रमुक शिवशेना),विश्वनाथ गायकवाड,निलेश महाले,विश्वनाथ गायकवाड,हरिभाऊ पवार,मुन्ना शेख,नारायण बारहाते, ज्ञानेश्वर भागवत,एकनाथ भालेराव,मनोज भागवत,सुनील शिंदे,चेतन गायकवाड,नारायण मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते