महिलांसाठी दोन दिवसीय महिला सबलीकरण शिबीर

महिलांसाठी दोन दिवसीय हिला सबलीकरण शिबीर

येवला: प्रतिनिधी
 तालुक्यातील राजापूर येथे  येवला लासलगाव शिवसेना व नारायणगिरी महाराज फाउंडेशन यांच्या संयूक्त विद्यमाने ग्रामिण भागातील महिलांसाठी महिला सबलीकरण दोन दिवसीय
   शिबीर आयोजित करण्यात आले या शिबिराचे उदघाटन उपसभापती रूपचंद भागवत यांच्या हस्ते झाले या शिबिरात ज्या महिलांचा शिवणक्लास पूर्ण झाला आहे परंतु त्यांना मास्टर कटिंग येत नाही अशा महिलांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान एमएफडी मॅजिक कटिंग स्केलमाफॅत फॅशन डिझाईन शिवणकामातील कटिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रसंगी कोपरगाव येथील एमएफडी मॅजिक कटिंग स्केलचे प्रशिक्षक शंकर बोरणारे, मोनाली बोरणारे, शिवनाथ बोरणारे  यांनी महिलांना प्रशिक्षण देत आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिवसेना गट प्रमुख अशोक आव्हाड प्रमूख पाहुणे नवनाथ खोडके, हिम्मतराव जमधडे, संतोष गोरे,समाधान सोमासे,बाळासाहेब दाणे,शंकरराव अलगट, समाधान चव्हाण, भाऊसाहेब बैरागी ,देविदास गूडघे, दत्तू वाघ, दत्तू मुंढे रावसाहेब नागरे  हे होते राजापूर ग्रामपंचायतीच्या वतीने येवला प.स.उपसभापती रूपचंद भागवत यांचा सत्कार ग्रामविकासअधिकारी आर एस मंडलिक यांनी केला यावेळी आर एस मंडलिक दत्तू जेजूरकर,  बाळासाहेब दाणे, रूपचंद भागवत, यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक व आभार  लक्ष्मण घूगे यांनी केले यावेळी नारायणगिरी फाऊडेशन प्रसिध्दी प्रमूख एकनाथ भालेराव,ज्ञानेश्वर भागवत, अनिल अलगट  अशोक मूढे, राजेन्द्र सानप,रामदास जाधव,पूडलिक डिके, विजय सानप,शंकर मगर,ईस्माइल सैय्यद, प्रविण वाघ, जनादॅन आंबेकर आदीसह ग्रामस्थ व प्रशिक्षणाथीॅ महिला  उपस्थित होत्या.
,,,,,,,,,,,,,,,,,,,
"हा उपक्रम येवला लासलगाव मतदार संघातील सर्व महिलांसाठी राबविणार आहोत सर्व इच्छुक महिलांनी या उपक्रमात भाग घेऊन ब्लाउज कटिंग व पंजाबी ड्रेस कटिंग मधील मास्टर कटिंग चे कौशल्य वाढवावे ,,,,,
विष्णुजी भागवत (उद्योजक) ,रुपचंद भागवत (उपसभापती)
नारायणगिरी महाराज फाउंडेशन , संस्थापक अध्यक्ष
थोडे नवीन जरा जुने