काव्यवाचन आणि अभिनय स्पर्धेत ४९० विद्यार्थ्यांचा सहभाग मुलींचा प्रचंड प्रतिसाद आणि सहभाग




काव्यवाचन आणि अभिनय स्पर्धेत ४९० विद्यार्थ्यांचा सहभाग
मुलींचा प्रचंड प्रतिसाद आणि सहभाग


येवला : प्रतिनिधी

 महात्मा फुले अकादमी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, येवला शाखा यांचे संयुक्त विद्यमाने  आणि पंचायत समिती शिक्षण विभाग येवला यांचे सहकार्याने येवले तालुक्यात काव्य वाचन स्पर्धा आणि एकपात्री अभिनय स्पर्धा  ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आली. येवले तालुक्यातील १६ केंद्रावर झालेल्या या स्पर्धेत एकूण ४९६ स्पर्धकांनी सहभाग घेतला असून ३१० विद्यार्थिनी असून १७९ विद्यार्थी सहभागी झाले आहेत तर शाळाबाह्य ७ युवक युवती सहभागी झाले असल्याची माहिती महात्मा फुले अकादमीचे अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी दिली आहे.  या स्पर्धे नंतर सर्व केंद्रावर अभिनय स्पर्धेत आणि काव्यवाचन स्पर्धेत प्रथम आलेल्या स्पर्धकांना दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांना येवल्यातील महात्मा फुले नाट्यगृहाच्या स्टेजवर सादरीकरण करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्या नंतर या सर्व स्पर्धकांची उपांत्य स्पर्धा घेण्यात येऊन अंतिम स्पर्धे करिता निवड करण्यात येईल अशीही माहिती  गायकवाड यांनी दिली. येवले तालुक्यात अंगणगाव, अंदरसूल, भारम, बोकटे, चिचोंडी, देशमाने, गवंडगाव, जळगाव , कुसमाडी, नागडे, पाटोदा, राजापूर, सायगाव ,सावरगाव,सोमठाणदेश,आणि येवला या केंद्रात या स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. या स्पर्धे करिता परीक्षक म्हणून कला व वाणिज्य महाविद्यालय येवला चे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांचेसह चित्रपट दिग्दर्शक संजीव सोनवणे,  कवी लक्षण बारहाते, कवी बाळासाहेब सोमासे, शिवाजी भालेराव ,शंकर अहिरे, नानासाहेब पटाईत, अस्मिता गायकवाड, निर्मला कुलकर्णी, स्मिता परदेशी, प्रा. शरद पाडवी, बिपीन ज्ञाने, सुवर्णा चव्हाण, सचिन साताळकर, आर.बी.वाघ विनोद घोलप, रमेश पवार,  योगेंद्र वाघ आणि  सुनील गायकवाड, याशिवाय येवला साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुर्यकांत सस्कर आणि विक्रम गायकवाड यांनीही परिक्षक म्हणून जबाबदारी पार पडली. या स्पर्धेच्या संयोजना करिता गट शिक्षण अधिकारी मनोहर वाघमारे , विस्तार अधिकारी आर.के. गायकवाड यांचे सह सर्व केंद्रप्रमुख यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले. या स्पर्धांच्या उपक्रमात पंचायत समितीच्या सभापती  नम्रता विजय जगताप, उपसभापती  रुपचंद भागवत  सदस्य प्रवीण गायकवाड, यांचा सहभाग लाभला.  वले तालुक्यातील १६ केंद्रावर झालेल्या या स्पर्धेत एकूण ४९६ स्पर्धकांनी सहभाग घेतला असून ३१० विद्यार्थिनीसहभागी झाल्यात  


थोडे नवीन जरा जुने