येवल्यात श्री लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
येवला : प्रतिनिधी
श्री लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय संस्था यांचे तर्फे शहरातील जनता विद्यालय, एन्झोकेम विद्यालय व स्वामी मुक्तानंद विद्यालय येथुन सन २०१८ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावी विज्ञान शाखेतुन प्रथम तिन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले तसेच कला व वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यांत आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राठी ट्रस्टचे प्रमुख किशोर राठी हे उपस्थित होते.
श्री लक्ष्मीनारायण बहुउद्देशीय संस्थेद्वारे दरवर्षी हा सत्कार समारंभ आयोजीत करण्यांत येतो. सदरचा सत्कार समारंभ जनता विद्यालयाचे प्रांगणात पार पडला. सत्काराचे स्वरुप प्रथम क्रमांकास रोख स्वरुपात रु.१५००, द्वितीय क्रमांकास रु. १००० तर तृतिय क्रमांकास रु.८०० तसेच आकर्षक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे होते. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले.
याप्रसंगी गो.तु. पाटील, प्राचार्य भाऊसाहेब गमे, पर्यवेक्षक पटाईत, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सत्कारार्थी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.