सातबारा उताऱ्याअभावी शेतमाल विक्रीची नावनोंदणी रखडली सर्वर डाऊनमुळे शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबवा : संघाची मागणी



सातबारा उताऱ्याअभावी शेतमाल विक्रीची नावनोंदणी रखडली

सर्वर डाऊनमुळे शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबवा : संघाची मागणी  

 


येवला  : प्रतिनिधी

शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतमाल विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे.मात्र शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊन असल्यामुळे अद्ययावत सातबारा उतारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची नावनोंदणीसाठी अडचण होत आहे.नोंदणीची मुदत कमी असल्याने शेतकर्यांना उतारे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दिनेश आव्हाड व संचालकानी केली आहे.

शासनाच्या आधारभूत खरेदी किंमत योजनेअंतर्गत मूग,उडीद व सोयाबीन विक्रीसाठी येथील तालुका खरेदी विक्री संघात केंद्र आहे.येथे शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून त्यासाठी सातबारा उतारा गरजेचा आहे.मात्र शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊन असल्याने ऑनलाईन उतारा मिळत नसल्याचे शेतकरी येऊन संघात सांगत असल्याने ही नोंदणी ठप्प झाली आहे.मुग व उडीदाची ऑनलाईन नोंदणीची मुदत नऊ तारखेपर्यंतच असल्याने शेतकऱयांची गैरसोय टाळण्यासाठी या समस्येवर पर्याय शोधावा व उतारे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आज संघाचे अध्यक्ष दिनेश आव्हाड,संचालक भागुनाथ उशीर,दत्ता आहेर,राजेंद्र गायकवाड,भास्कर येवले, दत्तात्रेय वैद्य,सुरेश कदम,व्यवस्थापक बाबासाहेब जाधव आदींनी केली. या मागणीचे पत्र तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आले आहे.

या मुदतीत ऑनलाइन खरेदीसाठी नोंदणी न झाल्यास शेतकऱ्यांना शासकीय आधारभूत किमतीचा देखील लाभ मिळणार नसून मोठा आर्थिक फटका बसण्याचीही भीती आहे. एकतर दुष्काळाची स्थिती असल्याने पाणीटंचाईतही पिकवलेले पीक कवडीमोल दराने विक्रीचे संकट ओढवले जाऊ शकते.नोंदणीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता नसल्याने शेतकरी वंचित राहू नये व त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सातबारे सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी अध्यक्ष आव्हाड व सचालक मडळाने केली आहे.

 

"शासकीय आधारभूत योजनेअंतर्गत शेतमाल विक्रीची नोंदणी करताना सातबारा उतारा अनिवार्य आहे. मात्र तलाठ्यांकडून साईट बंद असल्याचे कारण शेतकऱ्यांना दिले जात आहे महसूल विभागाने शेतकरी या नोंदणीपासून व शेतमाल विक्रीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या‍वी."

दिनेश आव्हाड,अध्यक्ष,खरेदी विक्री संघ,येवला

फोटो Yeola 4_3

येवला : शेतमाल विक्रीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतीत सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याची मागणी तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे करतांना खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष व संचालक

 

 

थोडे नवीन जरा जुने