येवला मर्चंट बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मतदान हर्षाबेन पटेल यांची सात मते मिळवून अध्यक्षपदी वर्णी



 येवला मर्चंट बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मतदान

हर्षाबेन पटेल यांची सात मते मिळवून अध्यक्षपदी वर्णी

 

येवला  प्रतिनिधी 

  महिन्यापासून चर्चेत असलेल्या येथील येवला मर्चंट बँकेच्या अध्यक्ष निवडणुकीवरून पुन्हा एकदा बँक चर्चेत आली आहे. सोमवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत ही निवड बिनविरोध होईल असे वाटत असताना संचालकामध्ये अचानक दोन गट पडून मतदान प्रक्रिया घेण्याची वेळ आली.तेरापैकी सात मते मिळवत हर्षाबेन पटेल यांची चेअरमन पदी वर्णी लागली.

बँकेच्या कर्ज वाटपासह कामकाजाची एकच चर्चा होऊन मागील महिन्यात ठेवी काढण्यासाठी बँकेत ठेवीदारांनी एकच गर्दी केली होती. त्यावेळी सर्व संचालक एकत्र आलेले दिसले,त्यामुळे  अध्यक्ष निवड ही बिनविरोध होऊन यापुढे बँकेचे एकोप्याने कामकाज चालेल अशी अपेक्षा शहरवासियांना होती. सकाळपर्यंत बिनविरोध निवडीची चर्चाही सुरू होती. मात्र सभागृहात आल्यावर संचालकांत दोन गट पडलेले दिसले. अगोदरच्या चर्चेत पद्मा शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.सोबतच हर्षाबेन पटेल यांनीही अध्यक्षपदी अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली. त्यानंतर तासभर दोन्ही गटांच्या वेगळ्या वेगळ्या बैठका होऊन भरपूर चर्चा सुरु होत्या मात्र एकमत न झाल्याने अखेर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. दोन्ही गटाकडे प्रत्येकी सात संचालक होते. मात्र उपनगराध्यक्ष तथा संचालक सुरज पटनी कामानिमित्त मुंबईत असल्याने ते बैठकीला गैरहजर राहिले. परिणामी श्रीमती पटेल यांची निवडीचा मार्ग सुकर झाला. अन् बँकेतील या राजकीय हालचालींची एकच चर्चा शहरभर झाली. बँक अडचणीत असतांना यापुढील काळात कामकाज कसे चालते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांनी कामकाज पाहिले.सहकार अधिकारी विजय बोरसे,आर.पी.जाधव,बँकेचे व्यवस्थापक अरविंद जोशी यांनी सहकार्य केले.निवडीनंतर श्रीमती पटेल यांचा पद्मा शिंदे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

 


 
 10/15/18, 6:23:15 PM

थोडे नवीन जरा जुने