दंतरोग तपासणी शिबिराचे उपसभापती रूपचंद भागवत यांच्या हस्ते उद्घाटन
येवला : प्रतिनिधी
नेहरू युवा केंद्र सामाजिक विकास बहू उद्देशीय सेवाभावी संस्था येवला यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता हीच सेवा उपक्रमा अंतर्गत व स्व. अखतर शेठ शाह यांच्या स्मरणार्थ ईकरा अरबी मदरसा शाळेत मोफत दंत रोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटन सभापती रुपचंद भागवत यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संजय अण्णा कासार हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विलास भागवत सर, प्रमोद तक्ते, ज्ञानेश्वर भागवत, राहुल लोणारी, आशीष अंकाईकर, मनोज भागवत, दिपक भदाणे, रशिद शेख, आदी उपस्थित होते या प्रसंगी सभापती श्री रुपचंद भागवत यांनी सदर संस्था आज जे काम करत आहे त्याची गरज आहे आणि अश्या आर्थिक दुर्बल घटकांचा यात सामावेश ज्या उपक्रमात आहे अश्या उपक्रमात मला आपण उदघाटक म्हणून बोलावले मला खूप आनंद झाला. तसेच त्यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कामाचे कौतुक केले संजय कासार यांनी संस्था अध्यक्ष अजहर शाह यांच्या कामाची माहिती व संस्थेच्या कामाची प्राथमिक माहिती आलेल्या पाहुण्यांना दिली डॉ.निशात शाह यांनी दातांची काळजी व योग्य उपचार वेळीच केली तर आपले दात चांगले आणि मजबूत राहू शकता असे मार्गदर्शन त्यांनी केले. राहुल लोणारी यांच्या हस्ते सभापती व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले तसेच डॉ. निशात शाह यांचे सत्कार अश्विनी जगदाळे यांनी केले सूत्र संचालन अजहर शाह यांनी केले तसेच प्रस्ताविक राहुल लोणारी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्विनी जगदाळे आफ्रिन शेख सुलताना शेख इशरत खान निखत खान शबाना अन्सारी आदिंनी अथक परिश्रम घेतले