भुजबळांना आलेल्या धमकी पत्राविरोधात सायगावला निषेधसभा...
येवला : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ साहेबांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पत्राचा निषेध करण्यासाठी सायगाव ता.येवला येथे रोकडोबा पारावर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सायगावकरांनी मोठया संख्येने उपस्थित राहून हात उंच करून या धमकी पत्राचा निषेध व्यक्त केला.
भाजपा सेना सरकारवर व मनुवादी विचारधारेवर कडाडून टिका करित सरकारने भुजबळांच्या सुरक्षेची काळजी घेत झेड सुरक्षा पुरवावी. शरद पवारांनंतर सर्व समाजघटकांना बरोबर घेउन जाणारे नेतृत्व म्हणजे छगन भुजबळ असुन समतेचा विचार हा देशाला दिशा देणारा असुन आगामी काळात राज्यात सत्तापालट करण्यासाठी भुजबळच ठोस भुमिका घेत असल्याने सत्ताधारी व मनुवादी वृत्तीनी भुजबळांना लक्ष करून धमकीपत्रचे षडयंत्र रचले असल्याचे महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ सल्लागार समिती संचालक भागुनाथ उशीर यांनी सांगितले.
यावेळी मा.सरपंच गणपत खैरणार, उपसरपंच दिनेश खैरणार, संजय मिस्तरी, वसंतराव खैरणार, राहूल भालेराव, भाउसाहेब आहिरे, दिपक खैरणार,कांतिलाल सोनवणे, शरद भालेराव, धनाजी पठारे, आदिंनी मनोगत व्यक्त केले..
याप्रसंगी मा.सरपंच सुनिल देशमुख, विजय खैरणार, अनिल देशमुख, पोपट कांडेकर,जेष्ठ समाजसेवक बशीरभाई शेख, दिनकर लोहकरे , सुभाष भालेराव ,संजय देशमुख, सिताराम लोहकरे, ज्ञानेश्वर भालेराव, आंबादास उशीर, रघुनाथ खैरणार,विलास उशीर, गणपत उशीर, भास्कर गायकवाड, बबनराव आव्हाड,चिंधु ढाकणे, बाबा बारे,दत्तू कूळधर, अनंत गाडेकर, बबन उशीर, अशोक कुळधर, श्रीपद भालेराव, दिलीप ढाकणे, नाना उशीर, विठ्ठल दारुंटे, देविदास जानराव, अरुण जानराव, विठ्ठल देवडे आदि उपस्थीत होते..