ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने प्रांताधिकार्यांना निवेदन


ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने प्रांताधिकार्यांना निवेदन


येवला : प्रतिनिधी

 शहरातील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरीक संघ, श्रीराम ज्येष्ठ नागरीक संघ व जगदंबा माऊली महिला ज्येष्ठ नागरीक संघाच्या वतीने ज्येष्ठांच्या विविध मागण्या मंजुरीसाठी येथील प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. 
ज्येष्ठ नागरीकांचे वय ६५ वर्ष ऐवजी ६० वर्ष इतके करावे व त्यानुसार ज्येष्ठांना एसटी प्रवासात सवलत मिळावी. शासनाच्या वेळोवेळी निघालेल्या जीआर नुसार ज्येष्ठांना दिलेले ओळखपत्र विविध शासकीय कामासाठी नियमबाह्य ठरविण्यात येत असून याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आदी विविध मागण्यासाठी ज्येष्ठांनी हे निवेदन दिले.   सदर मागण्या ह्या लवकरात लवकर वरीष्ठांकडे पाठविण्यात येतील असे आश्‍वासन प्रांताधिकारी कार्यलयाचे वतीने देण्यात आले. 
याप्रसंगी ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रामेश्‍वर कंलत्री, रावसाहेब दाभाडे, उपाध्यक्ष दिगंबर
गोविंदराव खराडे, राजेंद्र आहेर, विजय पोंदे, शिंदे गुरुजी, निंबा वाणी, दिनकर कंदलकर, शामसुंदर काबरा, बाळकृष्ण पाटोदकर, अशोक जाधव, दिलीप पाटील, पांडुरंग विंचू, सुभाष शूळ, गोविंद खराडे, रमेश लाड, पैठणकर, मोरे यांचेसह ज्येष्ठ नागरीक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

थोडे नवीन जरा जुने