जवान शेळकेंच्या मृत्यूची केंद्रीयस्तरावर चौकशी करावी ना. गिरीष महाजन यांची मागणी




जवान शेळकेंच्या मृत्यूची केंद्रीयस्तरावर चौकशी करावी
ना. गिरीष महाजन यांची मागणी

 येवला : प्रतिनिधी

तालुक्यातील मानोरी येथील दिगंबर शेळके या जवानाचा ड्युटीवर असतांना आसाम येथे संशयस्पद झालेल्या मृत्यूचा केंद्रीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी पालकमंत्री गिरीष महाजन यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
भाजपा नेते बाबा डमाळे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे म्हटले आहे की, मानोरी येथील जवान दिगंबर शेळके हे तुकडी न. ओसाई ३० बटालियन १ तेजपूर आसाम येथे ड्युटीवर असतांना त्यांचा २३ नाव्हेंबर रोजी संशायास्पद मृत्यू झाला असून त्यांनी गोळी मारुन आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात येत असले तरी शेळके यांच्या कुटबियांच्या म्हणण्यानुसार हा घातपात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय स्तरावर या बाबत चौकशी करण्यासाठी ना. गिरीष महाजन यांनी विनंती केली आहे. तसेच आवश्यक ती कार्यवाही करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

थोडे नवीन जरा जुने