येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा : रूपचंद भागवत
येवला : प्रतिनिधी
तालुक्यात पुरेसा पाऊस न पडल्याने भयानक दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे . शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा भयानक प्रश्न भेडसावू लागला आहे.पावसाअभावी खरिपातील बाजरी मका,सोयाबीन हे पिके हंगामासह हातातून गेले. कांदा पीक ही पाण्याअभावी वाया गेले आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे.आस्मानी संकटामुळे बाजरी मका कपाशी भाजीपाला, टोमॅटो आदी पिके पूर्णपणे वाया गेली आहे.एकीकडे पाण्याचा तुटवडा तर दुसरीकडे भाजप सरकारचे धोरण ह शेतकरी विरोधी असल्याने व शेतमालास योग्य बाजार भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी, मजुर हवालदिल झाला आहे. येवला तालुक्यात एकही जोरदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील बरेच बंधारे नद्या पाझर तलाव विहिरी कोरड्या ठाक आहे . 1972 साली पडलेल्या दुष्काळापेक्षाही सध्याची परिस्थिती भयानक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न येत्या काही दिवसांत गंभीर बनत चालला आहे , येवला तालुक्यातील खरिपातील सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसली आहे त्यामुळे काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे , तालुक्यातील सर्वच नदी नाले बंधारे कोरडे असल्याने व परिसरातील पाण्याची पातळी कमालीची घटल्यामुळे येत्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे अशा दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचवणे मोठे जिकरीचे आव्हान शेतकरी,सामान्य नागरिकांना आहे, त्यामुळे येत्या काही दिवसात दूध संकलनावर मोठा परिणाम होणार आहे.
येवला तालुक्यात वर्षभर शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतमालास शासनाच्या हमीभावाचा फायदा झाला नाही,तसेच लासलगाव येवला मतदार संघातील सध्या दुष्काळाची छाया गडद होत आहे अशा प्रतिकूल परिस्थितीत शासनाने दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, येवला तालुक्यात सम्पूर्ण भागातील दुष्काळाची परिस्थिती भयानक होत चालली आहे तालुक्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे,आणेवारी कमी लावून शासनाने त्वरित दुष्काळ जाहीर करावा. वीज बिल ,कर्ज माफी द्यावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे पंचायत समितीचे उपसभापती तथा लासलगाव येवला शिवसेना विधानसभा संघटक रूपचंद भागवत यांनी शासनाकडे मागणी केली आहे.