उपसरपंचपदी दिपाली मच्छींद्र जाधव यांची बिनविरोध निवड
येवला : प्रतिनिधी
जऊळके ग्रामपंचायत उपसरपंच परशराम खैरनार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच निवडीसाठी मंगळवारी सरपंच शालिनी वाळके यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलविण्यात आली होती.उपसरपंचपदासाठी दिपाली मच्छींद्र जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी खरेदि विक्री संघाचे मा.चेअरमन खंडेराव जाधव व मावळते उपसरपंच परशराम खैरनार यांचे हस्ते नविन उपसरपंच दिपाली जाधव यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी दत्तु सोनवणे,उमाजी पवार,चांगदेव जाधव,उत्तमबाबा गवंडी,बाळासाहेब सोनवणे,शिवाजी जाधव,बाळु गवंडी,नाना जाधव,ज्ञानेश्वर जाधव,रामकृष्ण जाधव,बबनराव जाधव ,सिताराम जाधव ,परशराम दरगुडे,संपत खैरनार,भावराव जाधव,वाल्मिक वाकळे,संजय जाधव,राजेंद्र खैरनार,वसंत भड,शारदा खैरनार,हिराबाई धाञक,वाल्ह्याबाई सोनवणे,अनिल गवंडी,नारायण जाधव,दत्तु जाधव,राधु शिरसाठ,सचिन कड,अशोक खैरनार,भिमराव बलसाने,योगेश गवंडी आदिंसह ग्रामस्थ हजर होते.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ग्रामसेविका साधना थोरात यांसह ग्रामपंचायत कर्मचारी रुपेश कुंभारकर,संतोष पवार,दीपक भडकवाड यांनी काम पाहीले