पाटोदा परिसरातील कामांसाठी
जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा : बनकर
येवला : प्रतिनिधी
पाटोदा परिसरातील रस्त्यांच्या कामाचा जिल्हा परिषदेकडे आपला सततचा पाठपुरावा सुरु असून काही रस्त्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेशही निघाले आहेत. मात्र काही लोक न केलेले कामांचे श्रेय लाटत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर यांनी पत्रकान्वये सांगितले.
पाटोदा येथील रस्त्याच्या दुरावस्थे बाबत ग्रामविकास मंत्र्यांना काहींनी निवेदन दिले आहे. ही चांगली बाब आहे. जर पाटोद्यातील रस्त्यांकरिता निधी मिळणार असेल तर ही कामे आपल्या मंत्र्यांकडून लवकरात लवरकर मार्गी लावावी. परिसरातील शेतकर्यांची समस्या सुटेल, असा चिमटा जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर यांनी काढला. बनकर यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील काही रस्त्यांची दुरवस्था झाल्याने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी सातत्याने पाठपुरा केला आहे. जिल्हा परिषद सभागृहात सातत्याने पाठपुरावा केल्याने १२ सप्टेंबर रोजी प्र. मा. निघालेली असून या अंतर्गत लौकी शिरसगाव ते मुखेड फाटा या ० ते २ असा २ किमीचा रस्ता मंजूर करण्यात आला असून २२.७५ लक्ष निधीस मंजूरी देण्यात आली आहे. तसेच पाटोदा ते शिरसगाव लौकी हा २.५ किमीचा रस्त्यासाठी २५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लौकी आडगाव ते विसापूर या ३ किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २० लक्ष रुपये तर सोमठाण ते शिरसगाव हा दिड किमीच्या रस्त्यासाठी १९ लक्ष रुपये मंजूर असल्याचे बनकर यांनी सांगितले. या सर्व रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन लवकरच भुजबळांच्या हसते होणार असल्याचे बनकर यांनी म्हटले आहे.