न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
येवला : प्रतिनिधी
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांनी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख,इंडिया २०-२०,इग्नाइट माइंड्स,टर्निंग पॉइंट्स,माय जर्नी,इत्यादी प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डी डी अहिरराव सर होते.विद्यालयाचे पर्यवेक्षक एस आर पैठणकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विंचु व्ही एस यांनी केले.
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एस सी ढोमसे,श्री जी एस नागरे,श्रीमती निकम मॅडम,इ.सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.