![](https://mailtrack.io/trace/mail/22d70833a6c8a441074397c323e710443893922c.png?u=3386328)
धर्मांतर घोषणेच्या वर्धापनदिनानिमित्त मुक्ती महोत्सवाचे उद्घाटन
येवला : प्रतिनिधी
तुमच्या सर्वांच्या सहभागा शिवाय धम्म चळवळ कशी जाईल पुढं..भीमा तुझ्या मताचे माणसे गेली कुठं असा सवाल करत मानवी दुःखाच कारण अज्ञानात असून लोकप्रबोधना करता धम्म स्कुल लोक चळवळ बनवावी असे उदगार भन्ते आनंद सुमन यांनी केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था नाशिक व लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येवला संयुक्त विद्यमानाने ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८३ व्या वर्धापनदिनानिमित्त (ता.१३) मुक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या महोत्सवाचे उदघाटन बोधी वृक्षाला पाणी टाकून भन्ते आनंद सुमन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. प्रा.उमेश पठारे,प्रा.उल्हास फुलझेले,पूजा गोसावी,ऍड.प्रदीप गोसावी प्रा.शरद शेजवळ,सुरेश खळे,महेंद्र पगारे,रंजना पठारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आज पहिल्या दिवशी धम्म स्कुल प्रशिक्षण कार्यशाळा मुक्तीभूमी येथे झाली.
धम्म स्कुल,अभ्यासक्रम,परीक्षा,रचना समजून देऊन धम्म आचरण म्हणजे स्वतः बरोबर लोक उद्धार,धम्म लोकांनपर्यंत नेण्याचा कणभराहून ही अत्यल्प प्रयत्न असल्याचे मत मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक शरद शेजवळ यांनी व्यक्त केले.आपल्या सहभाग जागृती शिवाय परिवर्तन शक्य नाही असे सांगून बंधू भगिनी सर्वांनी सहभागी व्हा असे कळकळीची आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेला संयोजक सुरेश खळे,विनोद त्रिभुवन,अशोक पगारे, मिलिंद गुंजाळ,बाळासाहेब गोविंद,बाबूलाल पडवळ,गौरव साबळे,सौरभ जाधव,संदेश जाधव,बापू वाघ,गौरव थोरात,तेजस पठारे,संतोष उबाळे,दयानंद जाधव,तेजस घोडेराव,मनोज गुंजाळ,राहुल गुंजाळ,पंकज डोळस, पद्मावती सोनवणे,तन्मय पगारे,मोनाली पगारे,बाबासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते.
Yeola 30_4 येवला : धर्मांतर घोषणेच्या वर्धापनदिनानिमित्त मुक्ती महोत्सवाचे उद्घाटन करतांना भन्ते आनंद सुमन.