येवला विधानसभा मतदारसंघातील 4 इतर जिल्हा मार्गांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा
आ. भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश
येवला : प्रतिनिधी
येवला विधानसभा मतदार संघात येवला व लासलगाव बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र आहे. या दोन्ही बाजार समित्या आशिया खंडातील नामांकित आणि अग्रेसर संस्था म्हणून ओळखल्या जातात. कांदा आणि फळभाज्या या भागातील प्रमुख कृषी उत्पादने आहेत.या प्रमुख उत्पादना बरोबरच येथील कृषी उद्योगही प्रगतीकडे वाटचाल करीत आहे गेल्या पंधरा वर्षा पासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ छगनराव भुजबळ यांचे नेतृत्वातून या मतदार संघातील सर्वांगीण विकासा बरोबरच गाव वाड्या वरील रस्त्यांची कामे झाल्याने येथील उद्योग अधिकच बहरला. दर्जावर्धन करण्यात आलेल्या या रस्त्यांवर या भागातील शेतमाल बाजार पेठे पर्यंत नेण्यासाठी मोठी वाहतूक वर्दळ असते दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने आ भुजबळ साहेब यांनी शासनाकडे याकामी सातत्याने पाठपुरावा केल्याने या रस्त्यांच्या मजबुती करणाचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती आ. भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे यांनी दिली
येवला मतदार संघातील व निफाड तालुक्यातील मऱ्हाळगोई विंचूर सुभाष नगर सोनेवाडी कोलवाड ते निफाड प्रमुख राज्य मार्ग 44 ला जोडणारा 20 की मी लांबीचा रस्ता वप्रमुख राज्यमार्ग 2 नैताळे ते राज्यमार्ग 27 दिंडोरी खानागाव थडी तारुल खेडले तामसवाडी झुंगे कोळगाव रुई धानोरे डोंगरगाव विंचूर विठ्ठल वाडी कोटमगाव राज्यमार्ग 27 ला जोडणारा 40 किमी लांबीचा रस्ता तसेंच शिवडी सोनेवाडी नै ताळे धारणगाव गाजरवाडी राज्यमार्ग 7 ला जोडणारा 27 किमी लांबीचा रस्ता आणी प्रमुख जिल्हा मार्ग 69 पाचोरे मऱ्हाळगोई वाहेगाव नांदगाव धरणगाव गाजरवाडी राज्यमार्ग 27 ला जोडणाराक26 किमी लांबीचे एकूण 114 लांबीच्या रस्त्याना या दर्जावर्धना चा लाभ होणार असून या रस्त्यांच्या नूतनीकरन व मजबुती करण्याकामी शासनाच्या विविध योजना च्या अंमलबजावणी साठी सुलभता येणार आहे आणि या परिसराबरोबरच दोन्ही तालुक्यातील उदयोगधंद्या सह कृषी क्षेत्राला भरभराट येणार असल्याची माहिती आ. भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक श्रीबाळासाहेब लोखंडे यांनी दिली .