संत सेना महाराज यांना येवला येथे अभिवादन ,
येवला : प्रतिनिधी
येथील श्री संतसेना महाराज मुर्तीस सकाळी श्री व सौ सनी सोनवणे यांच्या हस्ते रूद्राभिषेक करीत संत सेना महाराज यांना अभिवादन , करण्यात आले . त्या नंतर दुपारी नाभिक आरक्षण विषयी शासन दरबारी निवेदन देण्यासाठी समाज बांधवांची सह्याची मोहीम राबवीण्यात आली.सायंकाळी संतसेना महाराज मिरवणुकीत संतसेना महाराज यांच्या वेशातील बालक श्रीरंग सस्कर सर्वाचा आकर्षक ठरला येवला शहरातुन सुमधुर बॕन्ड पथकाने येवले करांना मंञ मुग्धकेले.शहरातील विविध भागातील बंधु भगिनीं सडा रांगोळी करून भव्य असे स्वागत केले.मिरवणूकित जेष्ठ नेते माणिकराव शिंदे ,नगराध्यक्ष बंडु क्षिरसागर ,नगरसेवक प्रमोद सस्कर ,माजी नगरसेवक किशोर सोनवणे ,जिल्हा युवा अध्यक्ष गणेश जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन सोनवणे ,अध्यक्ष अतुल व्यवहारे ,सहभागी झाले.सायंकाळी महाआरती गणेश व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आली.प्रकाश जाधव व अतुल व्यवहारे यांचा सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला.अजय वाघ. भुषन संत.वाल्मिक व्यवहारे .सुनिल सस्कर .श्रीकांत हिरे .अविनाश सोनवणे .आकाश भदाने.प्रशांत व्यवहारे .आदीनी.परिश्रम घेतले समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते....