आत्मा मालिक माऊलीच्या प्रकटदिनानिमित्त येवला येथून भव्य दिंडी सोहळा



आत्मा मालिक माऊलीच्या प्रकटदिनानिमित्त          येवला येथून भव्य दिंडी सोहळा       
    
 
 
  येवला  : प्रतिनिधी
सद्गुरू आत्मा मालिक तपोभूमी, येवला येथून अनंत चतुर्दशीचे दिवशी महादिंडी सोहळा काढण्यात आला होता.या भूमीवर सन १९६७ मध्ये जंगलीदास माऊली यांनी कठोर तपश्चर्या करून ११ महिन्याचे निराहर तप केले.अनंत चतुर्दशीचे दिवशी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला म्हणून आत्मा मालिक परिवारातील भाविक व भक्तगण हा दिवस आत्मसाक्षात्कारी दिवस म्हणून साजरा करतात.
          या दिवशी येवला ते कोकमठाण पायी दिंडी काढण्यात आली.घराघरांतुन १११ (एकशे अकरा) बांबूच्या पाट्या सजवून १११ प्रकारची मिठाई सद्गुरू चरणी कोकमठाण येथे अर्पण करण्यात आली.दिंडीचा सोहळा अत्यंत भव्य दिव्य असा होता.यात ११०० महिला व पुरुष तसेच भजनी मंडळ समाविष्ट झाले होते. दिंडी कोकमठाण येथील आश्रमात पोहोचली.त्या ठिकाणी सर्व विश्वस्त व संत यांनी दिंडीचे स्वागत करून सत्संग मंडळात सर्वांना सुविधा करून आणलेला १११ प्रकारचा प्रसाद सद्गुरुसमोर अर्पण केला.
            या दिंडीचे नियोजन येवला व पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष  हनुमंतरावजी भोंगळे यांनी तेथील संत कंकाली बाबा व सेवादास महाराज यांचेसह केले होते. दोनही गुरुकुलाचे प्राचार्य व शिक्षकवृंद देखील बरोबर होते .आत्मवंदनेचा व भजन किर्तनाचा कार्यक्रम होऊन  सांगता झाली.
 


थोडे नवीन जरा जुने