जळालेले रोहित्र तातडीने दुरुस्त करून बसवा प्रहार शेतकरी संघटनेची महावितरणकडे मागणी



जळालेले रोहित्र तातडीने दुरुस्त करून बसवा
प्रहार शेतकरी संघटनेची महावितरणकडे मागणी
येवला : प्रतिनिधी
तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे.विहिरी आणि कुपनलीकामधील पाण्याने तळ  घातलेला आहे.आशा परिस्थितीत तालुक्यात अनेक ठिकाणी रोहित्र जळालेले असून महावितरणकडून सदरचे रोहित्र दुरुस्त करण्यात येत नसल्याने संतापाची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.जळालेले रोहित्र तिवारी दुरुस्त करून न बसविल्यास प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन ,उपाध्यक्ष वसंत झांबरे ,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शरद शिंदे,प्रहार अपंग क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संध्याताई जाधव यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रजापती यांची समक्ष भेट घेऊन जळालेल्या रोहित्रावषयी गाऱ्हाणी मांडली. पाण्याची पातळी संपूर्ण तालुक्यात खालाविलेली आहे.पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रात बंधारे काही प्रमाणावर भरून दिलेले असल्याने पाण्याची पातळी विहिरींची या भागात टिकून आहे. अशावेळी केवळ रोहित्र जळालेली असल्याने शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह उभ्या पिकांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे.महावितरण रोहित्र दुरुस्तीसाठी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.महावितरणने आडमुठेपणा न सोडल्यास कुठलीही पूर्व सूचना न देता महावितरणच्या कार्यालयात प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलनसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या लेखी निवेदन देण्यात आला आहे .यावेळी किरण चरमल ,भागीनाथ गायकवाड ,भागवत भड ,संतोष रंधे, देवमन शेलार ,राजाराम ठाकरे,नानाभाऊ साठे,सुरेश कानडे ,ज्ञानेश्वर वाघ ,भावराव जाधव,राजेंद्र राऊत ,योगेश गाडे,उत्तम आहेर ,सखाहरी बारहाते ,विलास गाढे ,चंद्रकांत बारहाते  ,भाऊसाहेब गाढे  रमेश शेळके आदी शेतकरी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने